ETV Bharat / state

बीड जिल्ह्यात गुरुवारी आढळले 4 नवे कोरोना रुग्ण - बीड कोरोना रुग्ण संख्या

जिल्हा आरोग्य विभागाअंतर्गत गुरुवारी एकूण 158 कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. 158 पैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 3 पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे.

बीड कोरोना अपडेट
बीड कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 3, 2020, 8:21 AM IST

बीड - जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जिल्हा आरोग्य विभागाअंतर्गत गुरुवारी एकूण 158 कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. 158 पैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी गुरुवारपासून पुढील आठ दिवस पुन्हा बीड शहर लॉकडाऊन केले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये बीड शहरातील आसेफ नगर येथील 37 वर्षीय पुरुष, अजीजपुरा येथील 44 वर्षीय पुरुष, केज तालुक्यातील भाटुंबा येथील 38 वर्षीय पुरुष, भाटुंबा येथीलच 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. भाटुंबा येथील दोन्ही रुग्ण औरंगाबाद येथून प्रवास करून आलेले आहेत.

प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवलेल्या स्वॅबमध्ये बीड जिल्हा रुग्णालयातील 47, बीड कोरोना केअर सेंटर 29, आष्टी 12, केज 16, परळी 7, गेवराई 19, माजलगाव 3, अंबाजोगाईच्या (स्वाराती) 5 तर अंबाजोगाई कोरोना केअर सेंटर येथील 20 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.