बीड - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019च्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांत 202 उमेदवारांचे 270 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीणकुमार धरमकर यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा - परळीत धनंजय मुंडे यांना धक्का; काँग्रेसचे टी.पी. मुंडेंचा पंकजा मुंडेंना पाठींबा
विधानसभा मतदारसंघनिहाय वैध आणि अवैध उमेदवारी अर्जांचा अहवाल -
गेवराई मतदारसंघ - एकूण उमेदवारी अर्जांची संख्या - 43, वैध उमेदवारी अर्ज - 40,अवैध उमेदवारी अर्ज - 3, छाननीअंती वैध उमेदवारांची संख्या 28.
माजलगांव - एकूण उमेदवारी अर्जांची संख्या - 91, वैध उमेदवारी अर्ज - 80, अवैध उमेदवारी अर्ज - 11, छाननीअंती वैध उमेदवारांची संख्या - 54.
बीड - एकूण उमेदवारी अर्जांची संख्या - 71, वैध उमेदवारी अर्ज- 69, अवैध उमेदवारी अर्ज - 2, छाननीअंती वैध उमेदवारांची संख्या - 51.
आष्टी - एकूण उमेदवारी अर्जांची संख्या - 33, वैध उमेदवारी अर्ज - 25, अवैध उमेदवारी अर्ज - 8, छाननीअंती वैध उमेदवारांची संख्या - 24.
केज - एकूण उमेदवारी अर्जांची संख्या - 26, वैध उमेदवारी अर्ज - 23, अवैध उमेदवारी अर्ज - 3, छाननीअंती वैध उमेदवारांची संख्या - 15.
परळी - एकूण उमेदवारी अर्जांची संख्या - 53, वैध उमेदवारी अर्ज - 36, अवैध उमेदवारी अर्ज - 17, छाननीअंती वैध उमेदवारांची संख्या - 28.
बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदार संघात एकूण उमेदवारी अर्जांची संख्या - 317, वैध उमेदवारी अर्ज - 270, अवैध उमेदवारी अर्ज - 47, छाननीअंती वैध उमेदवारांची संख्या - 202