ETV Bharat / state

बीड: गळफास घेवून 26 वर्षीय तरुणाची आत्महत्या; कारण अस्पष्ट - 26 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली

शेतामध्ये चिंचेच्या झाडाला ठिबकच्या पाईपने गळफास घेवून 26 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

26-year-old commits suicide
26 वर्षीय तरुणाची आत्महत्या
author img

By

Published : Jun 29, 2020, 8:44 PM IST

बीड- शेतामध्ये चिंचेच्या झाडाला ठिबकच्या पाईपने गळफास घेवून 26 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना बीड तालुक्यातील रामनगर येथे सोमवारी घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अजय बंडू बरडे (वय 26 रा.रामनगर) असे मयताचे नाव आहे. तो रविवारी रात्री घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर रात्री घरी न परतल्याने घरच्या लोकांनी इतरत्र शोध घेतला मात्र अजयचा पत्ता लागला नाही. सोमवारी शेतात चिंचेच्या झाडाला ठिबकच्या पाईपने गळफास घेतलेल्या अवस्थेत अजयचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.ह.सातपुते, बाळकृष्ण म्हेत्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. अजय बरडे यांच्या पाश्चात आई, पत्नी, भाऊ, मुले असा परिवार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.