ETV Bharat / state

Youth Fall In Kund While Taking Selfie: सेल्फी घेताना तरुण 70 फूट कुंडात कोसळला, बचाव कार्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल - पर्यटन स्थळे

राज्यात काही ठिकाणी होणारा पाऊस जीवघेणा ठरत आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणचे पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाण्याच्या ठिकाणी असणारे पर्यटन स्थळे जीव घेणे ठरू शकतात, याचा प्रत्यय फर्दापूर येथे आला. अजिंठा लेणी पाहण्यासाठी गेलेला पर्यटक सेल्फी काढताना खोल कुंडात पडला. वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्याला वाचवणे शक्य झाले. या बचाव कार्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. अशा घटनांमुळे पाणी असणाऱ्या धबधबे, कुंड पर्यटनासाठी बंद करावे, अशी मागणी आता केली जात आहे.

Youth Fall In Kund While Taking Selfie
सेल्फीच्या नादात युवक पडला कुंडात
author img

By

Published : Jul 24, 2023, 11:58 AM IST

सेल्फीच्या नादात युवक पडला कुंडात

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : रविवारचा दिवस पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असणारा दिवस असतो, याच दरम्यान काही दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. अशीच एक घटना अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधब्याजवळ घडली आहे. गोपाल पुंडलिक चव्हाण हा युवक सेल्फी काढण्याच्या नादात शेवटच्या कुंडात पडला. त्याला पडताना काही लोकांनी पाहिले. तातडीने पुरातत्त्व विभागाच्या सुरक्षारक्षकांना याची माहिती कळविल्याने तो बचावला.

सेल्फीच्या नादात पडला : गोपाल आणि प्रेमसिंग राठोड हे दोघेही आपल्या मित्रांसह अजिंठा लेणी पाहण्यासाठी गेले होते. पर्यटन सुरू असताना सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे सप्तकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. त्याचे मनमोहक रूप पाहण्यासाठी हे सर्व मित्र तिथे गेले. शेवटच्या कुंडाजवळ असलेले सौंदर्य पाहिल्यावर सर्वांनी फोटो काढायला सुरुवात केली. त्यात गोपाल सेल्फी घेण्यासाठी शेवाळलेल्या भागात गेला. तिथेच पाय घसरून तो 70 फूट खोल कुंडात पडला. याची माहिती मिळताच तातडीने पुरातन विभागाच्या सुरक्षारक्षकांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.

पोहता येत असल्यामुळे वाचला जीव : गोपाल कुंडात पडल्यानंतर त्याच्या मित्रांनी आरडाओरड सुरू केला. तिथे असलेल्या काही नागरिकांनी तातडीने ही माहिती पोलिसांना आणि पुरातत्त्व विभागाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिली. त्यावेळी काही क्षणातच त्याच्या बचावासाठी प्रयत्न सुरू झाले. गोपालला पोहता येत असल्यामुळे कुंडात पडल्यानंतर तो कडेला आला. त्यावेळी सुरक्षारक्षक, पोलीस अशा 50 जणांच्या पथकाने सेल्फी बेल्ट, दोरी याच्या साहाय्याने तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर गोपालला सुखरूप बाहेर काढले. या प्रयत्नांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

सुरक्षेच्या उपाययोजना नाही : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या बाजूला सप्तकुंड धबधबा आहे. सात वेगवेगळ्या कुंडातून पाणी एका ठिकाणी पडते. मनमोहक असे दृश्य तिथे येण्याचे आकर्षण असते. मात्र अशा दुर्घटना पाहता, त्या ठिकाणी कोणीही जाऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत. धबधब्याकडे जाण्यासाठी वन उद्यानातून असलेला रस्ता बंद करण्यात आलेला आहे. तरीदेखील आलेले पर्यटक व्हू पॉइंटकडून जाणाऱ्या रस्त्याने डोंगरावर चढून त्या ठिकाणी जातात. या मार्गावर सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना नाहीत. त्यामुळे बंदी असलेल्या ठिकाणी जाऊ नये, अशा सूचना पर्यटन विभाग आणि पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आले आहेत.

फोटो काढणे जीवघेणे : आज कालचे युवक समाज माध्यमांचा चांगलाच उपयोग करताना दिसतात. समाज माध्यमांवर आपले फोटो अपडेट करण्याची हाऊस अनेक युवकांना जडली आहे. त्यामुळेच सुट्टीच्या दिवशी पर्यटनाला जायचे, फोटो काढायचे ते आपल्या पेजवर टाकायचे, असे व्यसन अनेकांना जडले आहे. त्यातूनच सर्वात चांगला फोटो कसा काढता येईल, यासाठी आपल्या जीवाची देखील काळजी हे युवक करत नाहीत. त्यामुळेच सेल्फीच्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्याचाच प्रत्यय अजिंठा लेणी परिसरात आला. दैव बलवत्तर म्हणून गोपालचा जीव वाचला. मात्र, प्रत्येकाचे नशीब असे असेलच असे नाही. त्यामुळे सेल्फी आपल्या जीवापेक्षा जास्त नाही, हा संदेश देण्याची वेळ आली असल्याचे सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

  1. Morbi CCTV पर्यटक सेल्फी घेत होते झुलत्या पूलाचा आनंद; दुुर्घटनेचा सीसीटीव्ही आला समोर
  2. student Died While Taking Selfie : सेल्फी काढणे बेतले जिवावर ; विद्यार्थ्याचा खदानीत बुडून मृत्यु
  3. Virar News : सेल्फी घेणे पडले महागात; चार जणी पडल्या नदीत, दोघींचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.