गंगापूर(औरंगाबाद) - चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 4 ऑगस्ट) दुपारी गंगापूर ते वैजापूर मार्गावरील वरखेड पाटीजवळ घडली. अन्साबाई भगवान लघाने (वय 55 वर्षे, रा. पानरांजणगाव, ता. पैठण), असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रामेश्वर भगवान लाघाने व त्यांच्या आई अन्साबाई लघाने हे दोघे दुचाकी (एम एच 20 बी व्ही 8366)ने गंगापूरहून नरहरी रांजणगाव येथे जात होते. त्याचवेळ गंगापूरहून वैजापूरच्या दिशेने निघालेल्या चारचाकी (एम एच 20 डी व्ही 6660)ने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत जखमींना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अन्साबाई यांना मृत घोषित केले. रामेश्वर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठई औरंगाबाद येथील घाटी रुग्णालय येथे दाखल केले आहे. अपघाताची नोंद शिल्लेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा - मराठवाड्याचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळवले; औरंगाबादेत भाजपा आक्रमक