ETV Bharat / state

Sandipan Bhumre:...अन् तिथून सटकलो; आमदार भुमरे यांनी सांगितला पलायन केल्याचा किस्सा

author img

By

Published : Jul 15, 2022, 9:52 PM IST

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेतील नाराजी उफाळून आली. कुठे जायचे, कोणालाच काही माहीत नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या मागोमाग निघायचा प्लान झाला. निवडणुकीनंतर निघायचे ठरले. अब्दुल सत्तार बंगल्यावर आले. त्याचवेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आले आणि प्लान फसणार अशी भीती वाटू लागली. काही काळ गोंधळ उडाला. मात्र, थातुरमातूर उत्तरे देत, त्यांच्या इथून सटकलो असा किस्सा बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांनी सांगितला. भुमरे यांच्या किस्स्यांनी रवींद्र नाट्यमंदिरात हशाचे फवारे उडाले.

आमदार भुमरे
आमदार भुमरे

मुंबई - पैठणचे बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांनी बंडखोर आमदारांचे सुरतच्या प्रवासातले किस्से सांगितले आहेत. बंडखोर आमदार आणि मंत्री एकाएकी उठून बंडात सामिल झाले नाहीत. तर ही नाराजी अनेक दिवसांपासूनची होती, असे संदीपान भुमरे यांनी सांगितले. तसेच, कुठल्याही निवडणुका असुद्यात संभाजीनगरमध्ये भगवा आपल्या नेतृत्वात फडकवणारच असे भुमरे म्हणाले.

त्यांना निधीसाठी बोललो, पण निधी दिला नाही - सूतगिरणी करायच्या वेळेस त्या वेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोललो पण काम केले नाही. आमच्याकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी निधी हवा होता. त्यासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे गेलो. त्यांना निधीसाठी बोललो, पण निधी दिला नाही, अशी खंत भुमरे यांनी व्यक्त केली.

आम्ही पदासाठी नाहीतर तालुक्याच्या फायद्यासाठी सोबत - आम्हाला शिंदे यांनी फोन केला आपल्याला निघायचे आहे. सत्तार यांना माझ्या बंगल्यावर बोलवले तेवढ्यात चंद्रकांत खैरे तिथे आले. खैरे यांना माहीतच नव्हते की आम्हाला बाहेर जायचं होत, ते बसले होते. आम्हाला निघायचे होते. आमची कुजबुज सुरू होती. पण खैरे यांना सांगायचं काय ? अखेर थातूरमातूर उत्तरे देऊन निघालो. तुम्ही ठाण्याकडे चला म्हणालात. ठाण्याकडे गेलो तर तुम्ही म्हणाल पुढे चला. सत्तार म्हणाले पुढे चला, पुढे चला पण पुढे जायचे कुठे कळत नव्हते. आज पुढं आलो म्हणून आता सगळे व्यवस्थित झाले आहे. आम्ही पदासाठी नाहीतर
तालुक्याच्या फायद्यासाठी सोबत आल्याचे भुमरे म्हणाले.

आमचे मुख्यमंत्री आम्हाला कधीच भेटत नव्हते - मला वॉचमन होते. अरे पण मी झेंडे रोवले, एकहाती सत्ता पैठणमध्ये आणली आहे. अनेक आरोप झाले पण आरोपाला आम्ही डागमगलो नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचे सभागृहात भाषण ऐकून रडू आले, अख्खा महाराष्ट्र टीव्ही समोर होता ते सगळे रडले. अनेक काम करण्याचा प्रयत्न होता, महाविकास आघाडीत मंत्री होतो पण काम होत नव्हते. लोकांना आम्ही काय सांगणार? वाईट वाटायचे की आमचे मुख्यमंत्री आम्हाला कधीच भेटत नव्हते. अखेर वर्षावर भेट जरी झालीतरी मुख्यमंत्री दोन मिनिटं बसून म्हणायचे दुसरे लोक मला भेटायला आले. नंतर बैठक लावू, असे सांगितले पण बैठक घेतली नाही, असे भुमरे म्हणाले. तसेच शिंदे साहेब ज्यांना तुम्ही मोठे केले. त्यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. सोडा म्हणू नका, सोडा म्हणायच्या ते लायकीचे नाही, असेही भुमरे यांनी स्पष्ट केले.

सुरतला जाण्यापूर्वी घडलेला किस्सा सभागृहात ऐकवला - आमचे आणि सत्तार यांचे थोडं मध्ये झाले होते. आता मात्र कुठलंही वाद नाही. म्हणून आम्ही दोघे एका गाडीत सुरतला आलो. सत्तार यांना त्यादिवशी उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता तुम्ही कुठे आहात म्हणून. तुमचे लोकेशन मुंबईत दिसत नाही. सत्तार म्हणाले, वसई विरारला जातोय नातेवाईक राहतो तिकडे. ते म्हणाले नंतर तुम्ही येताय ना? आम्ही हो म्हटलो. आणि थेट सुरतला गेलो, असे भुमरे यांनी सांगितले. सुरतला जाण्यापूर्वी घडलेला किस्सा सभागृहात ऐकवला. यावेळी जोरदार हशा पिकला होता.

हेही वाचा - पंजाब पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी 363 कोटींचे हेरॉईन केले जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.