औरंगाबाद: मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीने बाजी मारली. विक्रम काळे यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवत आपली सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळाले आहे. कोटा निश्चित झाल्यावर पहिल्या पसंतीमध्ये विजय मिळाला नसल्याने पुढील प्रक्रिया घेत दुसऱ्या पसंतीचे मतदान मोजण्यात आले. रात्री उशिरा निवडणूक अधिकाऱ्यांनी विक्रम काळे यांना विजयी घोषित केले. त्यांनी भाजपच्या किरण पाटील यांचा 6934 मतांनी पराभव केला.
महाविकास आघाडीकडून जल्लोष: दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच विक्रम काळे यांनी आघाडी घेतली होती. पुढे आघाडी मतांचा आकडा वाढत गेला. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात देखील काळे यांच्या मताची आघाडी कायम होती. त्यामुळे निकालापूर्वीच महाविकास आघाडीकडून जल्लोष साजरा करण्यात आला. तेराव्या बाद फेरीत अपक्ष उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांच्या मतमोजणी नंतर राष्ट्रवादीचे विक्रम काळे 23577, भाजपचे किरण पाटील 16643 अशी मते मिळाली. वैध मतानुसार विजयासाठी 25 हजार 386 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. दोन्ही उमेदवारांना हा कोटा पूर्ण करता आल्याने विक्रम काळे यांनी विजयी घोषित करण्यात आले. ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी विक्रम काळे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच काळे यांच्या समर्थकांकडून गुलाल उधळत विजय साजरा करण्यात आला. तर काही कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत आनंद साजरा केला.
विक्रम काळे यांचा चौथ्यांदा विजय: कधीकाळी मराठवाडा शिक्षक संघाच्या ताब्यात असणाऱ्या या मतदारसंघात 2004 मध्ये राष्ट्रवादीचे वसंत काळे आपल्या ताब्यात घेत, राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. तेव्हापासून हा मतदारसंघ कायम राष्ट्रवादीकडेच राहिला आहे. तर 6 जानेवारी 2010 ते 5 डिसेंबर 2016 पर्यंत विक्रम काळे या मतदारसंघात विजयी होऊन महाराष्ट्र विधान परिषदेत पहिल्यांदा गेले. त्यानंतर 8 फेब्रुवारी 2017 मध्ये पुन्हा दुसऱ्या वेळेस निवडुन आले. त्यानंतर 2017 ते 2022 पर्यंत ते तिसऱ्यांदा औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून निवडणून आले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी विजय मिळवत चौथ्यांदा मराठवाडा शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवला आहे.
भाजपकडूनही जोरदार प्रयत्न: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला मराठवाडा शिक्षक मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून देखील जोरदार प्रयत्न करण्यात आले. यासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. किरण पाटील यांच्या प्रचारासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा घेतली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात बैठका घेतल्या. मात्र असे असले तरीही भाजप उमेदवार किरण पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
हेही वाचा: Marathwada Teacher Constituency शिक्षक मतदार संघ निवडणूक मतदानाला सुरुवात कोण मारणार बाजी