ETV Bharat / state

Vijay Vadettiwar On Mahayuti : राज्यात तीन टग्यांचं राज्य; आधी 1 अलीबाबा 40 चोर, आता 2 अलीबाबा 80 चोर - Chief Minister Eknath Shinde

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलंय. आधी 1 अलीबाबा 40 चोर होते, आता 2 आलीबाबा 80 चोर आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलीय.

Vijay Vadettiwar On Mahayuti
Vijay Vadettiwar On Mahayuti
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 5:49 PM IST

विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : तीन टग्यांच्या सरकारमुळं शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. 1 जानेवारी ते आजर्यंत राज्यात 1 हजार 655 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण पिकं वाया गेली आहेत, तरी अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. सरकारनं तातडीनं पावले उचलावी, कर्नाटक राज्याप्रमाणे दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते.

भटक्या समाजासाठी उपोषण करणार : भटके विमुक्त जातीवर होत असलेल्या अन्याय, बोगस कागदपत्र तसंच बंजारा समाजाच्या भावना ऐकून घेतल्याची माहिती यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिली. एसटी आरक्षणात घुसघोरी करणाऱ्या जाती आहेत. ओबीसी, ST च्या जागेवर बोगस नागरिकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तसंच त्यांच्या विद्यार्थांनी घुसखोरी करून मेडिकल क्षेत्रात जागा बळकावल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. राजपूत समाजानं भामटा शब्द लावून जागा बळकावल्या, त्यामुळं वंचितांवर अन्याय होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता त्यावर शासनानं कारवाई करावी, नाहीतर मी छत्रपती संभाजीनगरात उपोषणाला बसेन, असा इशारा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. ओबीसी नेते राजेश राठोड यांना जीवे मरण्याच्या धमक्या येत आहेत, यांना सरकारनं सुरक्षा द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केलीय.

ऑनलाईन सुनावणी करावी : आमदार अपात्रतेबाबत ऑनलाईन सुनावणी घेण्याची मागणी करणार आहे. आजकाल न्यायालयीन सुनावणी ऑनलाईन होते, पारदर्शक सुनावणी व्हावी म्हणून लाईव्ह सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घ्यावी. ही सुनावणी जनतेला पाहता येईल, असं ते म्हणाले. सध्या राज्यात राजकारणी एकमेकांवर टीका करताना जनावरांच्या नावाचा उल्लेख करत आहेत. एकमेकांना लांडगा म्हणतात, मात्र सत्ताधाऱ्यांपेक्षा लांडगे इमानदार आहेत. ते कष्टाची शिकार खातात, सत्तेत असलेले 3 जण मिळून राज्याची तिजोरी लुटून खात आहेत, असा टोला वडेट्टीवार यांनी केली.

आरक्षणाबाबत कारस्थान सुरू आहे : आरक्षणाबाबत राज्यात कारस्थान सुरू आहे. कारण भाजपा आरक्षण देऊ शकत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम राज्य सरकारच्या हातात नाही, तर केंद्राच्या हातात आहे. भाजपा फक्त भांडण लावायचं काम करत आहेत. राज्यात 5 लाख जागा 9 कंपन्या भरणार आहेत. आरक्षण संपवून, पैसे जमा करण्यासाठी भरती केली जाणार असल्याचा कट भाजपा करीत असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. धनगर समाजाची बैठक मुख्यमंत्री घेणार आहे. मात्र हे फक्त ढोंग असल्याचं त्यांनी म्हटलंय. बऱ्याच मराठा समाजाकडं बोगस कुणबी प्रमाणपत्रं आहेत. त्यांना बोगस प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. पैसे घेऊन प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई, शिक्षा व्हायला हवी. कुणबी समाजाची बैठक घेऊन काही होणार नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. बोगस कामं करून सरकारनं मतं घेतली आहेत. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत 40 च्या पलीकडे भाजपाच्या जागा निवडून येणार नाहीत. मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही. पण ओबीसीमधील आरक्षण कमी करू नका, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

दोन अलीबाबा : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने छ. संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. त्यात मोठ्या घोषणा केल्या गेल्या. मात्र, या सर्वच जुन्या घोषणा नव्यानं केल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. खिशात नाना सगळ्यांना एकत्र आणा अशी बाब असून, शिळ्या काढीला उत आणत आहेत. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. अंगणवाडी सेविकांच्या वेतनाचे पैसे थकले आहेत. इतर बाबींसाठी पैसे नाहीत. पैसे होते ते खोके-खोके करून लुटून नेले. आधी 1 अलीबाबा 40 चोर होते, आता 2 आलीबाबा 80 चोर आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा -

  1. MLA Disqualification Case : ठरलं! 'या' तारखेपासून आमदार अपात्रतेसंदर्भात होणार सुनावणी; राहुल नार्वेकरांची माहिती
  2. Rohit Pawar Criticism BJP : भाजपाला लोकनेते आवडत नाहीत - रोहित पवार
  3. OBC Reservation : ओबीसीच्या मागण्यांवर २९ ला मुंबईत बैठक, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या निर्णयाकडं सर्वांचं लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.