ETV Bharat / state

Prakash Ambedkar on MIM : इम्तियाज जलील यांच्या उपोषणावर प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, औरंगजेब... - प्रकाश आंबेडकर औरंगजेबावर विधान

खासदार इम्तियाज जलील यांच्या औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधातील उपोषणाच्या स्थळी औरंगजेबचे फोटो झळकवण्यात आले. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचे फोटो लावले म्हणून मला काहीच नवीन वाटत नाही, असे यावेळी आंबेडकर म्हणाले आहेत.

Prakash Ambedkar on Aurangzeb
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Mar 5, 2023, 9:29 PM IST

Updated : Mar 5, 2023, 10:51 PM IST

प्रकाश आंबेडकर माध्यमांसोबत संवाद साधताना

पुणे : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णयाला केंद्र आणि राज्य सरकराने परवानगी दिली आहे. मात्र या निर्णयाविरोधात एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या या उपोषणाच्या स्थळी औरंगजेबचे फोटो झळकवण्यात आले. यावर आत्ता विरोध होत आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना विचारला असता ते म्हणाले की औरंगजेब या मातीतले नाहीत का? त्यांचा जन्म मोगल सलतनतमध्येच झाला ना, फोटो लावले म्हणून मला काही नवीन वाटत नाही, असे यावेळी आंबेडकर म्हणाले.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, औरंगजेब हा या मातीचा नाही का? त्यांचा जन्म मोगल सलतनत मध्ये झाला आहे ना? उपोषणात फोटो असणे, यात नवीन काही नाही. ज्यांना हिंदू मुस्लिम डिवाईड करायचे आहे, त्यांनी करावे. आज आपण पाहिले तर धार्मिक राजकारण जे देशात केले जाते आहे. त्याच प्रमाण हा वाढला आहे, असे देखील यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पोटनिवडणूकीच्या निकालावर प्रतिक्रिया: कसबा तसेच चिंचवड पोटनिवडणूकीत जो निकाल लागला आहे. त्याबाबत तसेच चिंचवडमध्ये वंचितने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पडला आहे, असे म्हटल जात आहे. यावर आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार नसता तर राहुल कलाटे आले असते. मी यावर जास्त बोलत नाही. दोन्ही ठिकाणी सरकारच्या विरोधातील हा निर्णय आहे. सरकारच्य नाकर्त्या कामामुळे हे जनमत आहे, असे देखील यावेळी आंबेडकर म्हणाले. तसेच भाजपला कसबामध्ये मते कमी झालेली दिसत नाही. रविंद्र धंगेकरांनी चांगली बांधणी केली म्हणून त्यांना अधिक मत मिळाली. मला असे वाटते की हा विजय रवींद्र धंगेकर यांचा आहे, असे देखील यावेळी आंबेडकर म्हणाले.

सिसोदियांवर कुठला चार्ज? : आपचे मनीष सिसोदिया यांनी अटक करण्यात आली आहे. यावर आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की सिसोदिया यांच्यावर काय गुन्हा दाखल केला आहे? हे मला कळालेच नाही. सिसोदिया यांच्यावर काय चार्ज लावला आहे. ना आप सांगत आहे, ना माध्यम सांगत आहे की काय चार्ज आहे? भाजप उचलते आहे आणि आत टाकते आहे. पॉलिसी मेटर असेल तर चार्ज होऊ शकत नाही, असे देखील यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अदानींवर काय म्हणाले? : विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. यावर प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, अदानी यांच्या बद्दल जे बोलले गेले आहे ते एका संस्थेने केलेल्या अहवालातून बोलले जात आहे. ज्यांची चौकशी झाली आहे आत्तापर्यंत त्यांची चार्जशीट का नाही बनवली जात? शासन केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. विरोधकांनी नरेंद्र मोदी अमित शहा यांना टार्गेट करायला हवे, असे देखील यावेळी आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा: Uddhav Thackeray in Khed : उद्धव ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, शिवसेनेचे नाव आणि चिन्ह माझ्यापासून हिरावून घेतले पण पक्ष....

Last Updated : Mar 5, 2023, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.