कन्नड (औरंगाबाद) - एका 60 वर्षीय महिलेने शिवना नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. 6 सप्टें) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास टापरगाव पुलाजवळ घडली. त्या महिलेल्या वाचविण्यासाठी एका तरुणानेही नदी पात्रात उडी मारली होती. मात्र, त्या तरुणाचे प्रयत्नाला यश आले नाही.
तालुक्यातील मक्रणपूर येथील राम नामदेव गंगावणे (वय 26 वर्षे) हा तरुण सकाळी सहा वाजता घरातून कासासाठी लासुर स्थानक येथे निघाला होता. सात वाजेच्या दरम्यान टापरगांव पुलावरुन जात आसताना पुलाच्या मध्यभागी एक महिला उडी मारण्याच्या बेतात त्याला दिसली. हे बघताच त्याने आपली दुचाकी थांबवली आणि आवाज देत महिलेस उडी मारण्यासाठी थांबविन्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत महिलेने पाण्यात उडी मारली होती. यामुळे तरुणाने बाजूला पुलाच्या काम सुरु आसलेल्या मजूरांना आरडा-ओरडा करून मदतीला बोलावले. लगेच महिलेस वाचविण्यासाठी स्वःत पाण्यात उडी मारली. यावेळी जमा झालेल्या मजूरांनी दोरिच्या साहय्याने तरुण व महिलेस पाण्याच्या वर काढले.
यावेळी महिला बेशुद्ध आवस्थेत आसल्याने पोट दाबून पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न करून तात्काळ खासगी वाहनातून कन्नड ग्रामीण रुग्णलयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून महिलेस मृत घोषित केले. त्या महिलेची ओळख अद्याप पटली नसून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - बीएसएनएलच्या महिला अधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी; दोन अट्टल गुन्हेगारांना अटक