ETV Bharat / state

कन्नड तालुक्यातील मेहेगाव येथे काकाने केला पुतण्याचा खून

जगन्नाथ घुगे यांच्या हातात असलेला फावडा त्यांनी अक्षयच्या छातीत व डोक्यात मारला. यात अक्षय जखमी झाला. त्याला नातेवाईकांनी तातडीने पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तापस केल्यानंतर अक्षयला मृत घोषित केले.

मेहेगाव खून प्रकरण, Mehegaon murder case
Mehegaon murder case
author img

By

Published : Jun 8, 2020, 10:51 PM IST

औरंगाबाद- कन्नड तालुक्यातील मेहेगाव येथे काकाने आपल्या 21 वर्षीय पुतण्याचा खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अक्षय एकनाथ घुगे असे मृत युवकाचे नाव आहे. पिशोर पोलीस ठाण्यात काकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेहेगाव येथे अक्षय एकनाथ घुगे याचे वडील एकनाथ गंगाराम घुगे हे त्यांचे भाऊ जगन्नाथ गंगाराम घुगे यांच्यासह आपल्या शेतात उभे होते. त्या ठिकाणी अक्षय एकनाथ घुगे आला व काका जगन्नाथ घुगे यांना म्हणाला की तुम्ही बांध का फोडला, असे म्हणून दोघामध्ये वाद व झटापट झाली.

जगन्नाथ घुगे यांच्या हातात असलेला फावडा त्यांनी अक्षयच्या छातीत व डोक्यात मारला. यात अक्षय जखमी झाला. त्याला नातेवाईकांनी तातडीने पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तापस केल्यानंतर अक्षयला मृत घोषित केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, स.पो.नि जगदीश पवार, उपनिरीक्षक विजय आहेर आदिंनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मृत अक्षय याचे वडील एकनाथ गंगाराम घुगे यांच्या फिर्यादीवरून पिशोर पोलीस ठाण्यात जगन्नाथ गंगाराम घुगे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. स.पो.नि जगदीश पवार, पो.ना संदीप कनकुटे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.