औरंगाबाद - घरासमोरील अंगणात खेळताना दोन वर्षीय बालकाचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. जालना जिल्ह्यातील ठाकूरवाडी येथे बुधवारी ही घटना झाली. शिव गजानन काळवने (वय 2 वर्ष) असे, या बालकाचे नाव आहे.
हेही वाचा - कर्तव्य बजावताना सुरेश चित्तेंना वीरमरण; संक्राती दिवशीच आलमला गावावर शोककळा
शिव हा घरासमोरील अंगणात खेळताना हौदा शेजारी असलेल्या दगडावरती उभा राहिला. अचानक तोल गेल्याने तो हौदात पडला. बराच वेळ शिव न दिसल्याने त्याच्या आईने शोधाशोध केली. त्यावेळी तो हौदामध्ये पडल्याचा दिसून आले. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ शिवला बाहेर काढून औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासणी करून मृत घोषित केले.