ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये कुत्र्याने चावा घेतलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

अक्षरा घरासमोर खेळत असताना कुत्र्याने तिचा चावा घेतला होता. त्यानंतर तातडीने अक्षराच्या आई-वडिलांनी तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, बुधवारी सकाळी ६ वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मृत अक्षरा राजू वावरे
author img

By

Published : Sep 11, 2019, 12:26 PM IST

Updated : Sep 11, 2019, 1:21 PM IST

औरंगाबाद - कुत्र्याने चावा घेतल्यामुळे दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात घडली. अक्षरा राजू वावरे, असे या दोन वर्षीय मुलीचे नाव होते. अक्षरा घरासमोर खेळत असताना कुत्र्याने तिचा चावा घेतला होता.

मुकुंदवाडी येथे 25 ऑगस्टला दारात खेळत असताना मोकाट कुत्र्याने अक्षराच्या चेहऱ्यावर चावा घेतला. त्यानंतर तातडीने अक्षराच्या आई-वडिलांनी तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला रेबीज इंजेक्शन दिले होते. त्यानंतर इंजेक्शनचा दुसरा डोस देखील तिला दोन दिवसांपूर्वीच देण्यात आला होता. मात्र, मंगळवारी रात्री अक्षराला ताप आला आणि ती अस्वस्थ झाल्याने तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी सकाळी ६ वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

घटनेविषयी सांगताना स्थानिक नागरिक प्रशांत

हेही वाचा - कुत्र्याला लाल रंगाचे ज्ञानचं नाही, तर कुत्रे लाल पाण्याला का घाबरतील - अंनिस

अक्षरा औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात राहत होती. वडील राजू वावरे मिळेल ते काम करून आपले कुटुंब चालवतात. लग्नानंतर मोठ्या प्रतिक्षेने अक्षराचा जन्म झाला होता. दोन वर्षांची अक्षरा अचानक सोडून गेल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. मोकाट कुत्र्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल स्थानिक नागरिकांनी याआधी अनेक तक्रारी महानगरपालिकेला दिल्या होत्या. मात्र, पालिकेने तक्रारींची दखल न घेतल्यानेच अक्षराचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा - बुलडाणा शहरानजीकच्या गिरडा जंगलात आढळले शेकडो कुत्र्यांचे मृतदेह

Intro:कुत्र्याने चावा घेतल्यामुळे दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात घडली. अक्षरा राजू वावरे असं या दोन वर्षीय मुलीचे नाव होतं. अक्षरा घरासमोर खेळत असताना कुत्र्याने तिचा चावा घेतला होता.

Body:25 ऑगस्ट रोजी दारात खेळत असताना मोकाट कुत्र्याने अक्षराच्या चचेहऱ्यावर चावा घेतला. त्यानंतर तातडीने अक्षराच्या आई-वडिलांनी तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला रेबीज इंजेक्शन दिलं होतं. त्यानंतर इंजेक्शनचा दुसरा डोस देखील तिला दोन दिवसांपूर्वी देण्यात आला होता. मात्र मंगळवारी रात्री अचानक अक्षराला ताप आला आणि ती अस्वस्थ झाल्याने अक्षराचा घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Conclusion:अक्षरा औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात राहत होती. वडील राजू वावरे मिळेल ते काम करून आपलं कुटुंब चालवतात. लग्नानंतर मोठ्या प्रतिक्षेने अक्षराचा जन्म झाला होता. दोन वर्षांची अक्षरा अचानक सोडून गेल्याने कुटुंबियांना धक्का बसलाय. मोकाट कुत्र्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल स्थानिक नागरिकांनी याआधी अनेक तक्रारी महानगर पालिकेला दिल्या होत्या. मात्र पालिकेने तक्रारींची दखल न घेतल्यानेच अक्षराचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय.
byte - प्रशांत कुरे - स्थानिक नागरिक
Last Updated : Sep 11, 2019, 1:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.