ETV Bharat / state

जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी, ९ जण गंभीर जखमी - farmer

मी घेणार मी घेणार म्हणून दोघांमध्ये वाद होता याकारणाने त्यांच्यात अगोदर किरकाळ वादावादी झाला होता, परंतु सोमवार ६ मे रोजी सकाळी आठ वाजता पुन्हा किरकोळ वाद झाला परंतु हा वाद गावकऱ्यांनी मध्यस्ती करून मिटवला.

जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी
author img

By

Published : May 7, 2019, 7:49 AM IST

औरंगाबाद - पाचोडहून जवळच असलेल्या मुरमा येथे शेतीच्या वादातून दोन गटात लाठ्या-काठ्यांनी फिल्मी स्टाईल तुफान हाणामारी झाली. यामध्ये ९ जण गंभीर जखमी झाले आहे. सोमवारी ६ मे ला सकाळी या गटात वाद झाला तो गावकऱ्यांनी सोडवला, मात्र रात्री पुन्हा दोन गटात वाद होऊन तुफान हाणामारी झाली.

जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी

मुरमा येथील राजेंद्र भाऊसाहेब भेरे व रमेश आबासाहेब लेंभे यांच्यामध्ये उद्धव लेंभे त्यांची विक्री असलेली शेती खरेदी करण्यावरून वाद झाला. मी घेणार मी घेणार म्हणून दोघांमध्ये वाद होता याकारणाने त्यांच्यात अगोदर किरकाळ वादावादी झाला होता, परंतु सोमवार ६ मे रोजी सकाळी आठ वाजता पुन्हा किरकोळ वाद झाला परंतु हा वाद गावकऱ्यांनी मध्यस्ती करून मिटवला. परंतु रात्री अकराच्या सुमारास दोन गटात किरकोळ बाचाबाची झाली आणि वाद सुरू झाला. या वादातून तुफान दोन गटांमध्ये काठीने मारहाण झाली.

यामध्ये राजू मुरलीधर भेरे ( वय ४८), शोभाबाई राजेंद्र भेरे (वय ४०), रवी राजेंद्र भेरे (वय २५), पवन भेरे (वय २२), रमेश आबासाहेब लेंबे (वय ५०), उद्धव आबासाहेब लेभें (वय ३२), दत्ता रमेश लेंभे (वय १९) तर नीलावती रमेश लेंभे (वय ४५), भागुबाई आबासाहेब लेंभे (वय ६०) हे जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ गावकऱ्यांनी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली सर्व जखमींवर पाचोड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू असून पाचोड पोलिस ठाण्यांमध्ये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Intro:शेतीच्या वादातून पाचोडहून जवळच असलेल्या मुरमा येथे दोन गटात लाठ्याकाठ्यांनी फिल्मी स्टाईल तुफान हाणामारी झाली असून यामध्ये ९ जण गंभीर जखमी झाले आहे. Body:सोमवारी सहा मे रोजी सकाळी या गटात वाद झाला तो गावकऱ्यांनी सोडवला, मात्र रात्री पुन्हा दोन गटात वाद होऊन तुफान हाणामारी झाली. Conclusion:मुरमा येथील राजेंद्र भाऊसाहेब भेरे व रमेश आबासाहेब लेंंभे यांच्यामध्ये उद्धव लेंभे त्यांची विक्री असलेली शेती खरेदी करण्यावरून वाद झाला. मी घेणार मी घेणार म्हणून दोघांमध्ये वाद होता याकारणाने त्यांच्यात अगोदर किरकाळ वादावादी झाला होती परंतु दिनांक ६ मे सोमवार रोजी सकाळी आठ वाजता पुन्हा किरकोळ वाद झाला परंतु हा वाद गावकऱ्यांनी मध्यस्ती करून मिटवला. परंतु रात्री अकराच्या सुमारास दोन गटात किरकोळ बोलीचालीवरून वाद सुरू झाला. वादातून तुफान लाठ्याकाठ्यांनी हाणामारी होऊन यामध्ये राजू मुरलीधर भेरे ४८ वर्षे, शोभाबाई राजेंद्र भेरे वय ४० वर्षे, रवी राजेंद्र भेरे २५ वर्षे,पवन भेरे २२ वर्ष, रमेश आबासाहेब लेंबे वय पन्नास वर्षे, उद्धव आबासाहेब लेभें वय ३२ वर्ष ,दत्ता रमेश लेंभे १९ वर्ष ,तर नीलावती रमेश लेंभे ४५ वर्ष ,भागुबाई आबासाहेब लेंभे ६० वर्षे, हे जखमी झाले आहेत जखमींना तत्काळ गावकऱ्यांनी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली सर्व जखमींवर पाचोड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू असून पाचोड पोलिस ठाण्यांमध्ये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.