ETV Bharat / state

अखेर औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळ सर्वसामान्यांसाठी खुली

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळ सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहेत. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले व्यवसायिक व पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण असून पहिल्या दिवशी जवळपास सहाशे पर्यटकांनी ऐतिहासिक वास्तूंना भेट दिल्याचे पाहायला मिळाले.

पर्यटकांची तपासणी करताना
पर्यटकांची तपासणी करताना
author img

By

Published : Dec 10, 2020, 4:30 PM IST

Updated : Dec 10, 2020, 4:39 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील पर्यटनस्थळ सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहेत. पहिल्या दिवशी जवळपास सहाशे पर्यटकांनी ऐतिहासिक वास्तूंना भेट दिल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या नऊ महिन्यांपासून पर्यटन स्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारने नियमावली जाहीर करून पर्यटनस्थळ उघडण्यास परवानगी दिली.

अखेर औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळ सर्वसामान्यांसाठी खुली
रोज एक हजार पर्यटकांना असेल परवानगी

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळ सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बैठक घेतली होती. जिल्ह्यातील वेरूळ, अजिंठा, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, पाणचक्की यांसह सर्व पर्यटनस्थळ उघडण्याबाबत संमती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. रोज एक हजार पर्यटकांना पर्यटनस्थळांवर प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये सकाळच्या सत्रात पाचशे तर दुपारच्या सत्रात पाचशे पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे.

कोरोनाचे नियम पाळून पर्यटकांना मिळतोय प्रवेश

कोरोनाच्या अनुषंगाने मार्च, 2020 पासून देशातील पर्यटनस्थळ बंद ठेवण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी देशातील पर्यटनस्थळ सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार आग्रा येथील ताजमहाल सुरू करण्यात आला होता. राज्यातील पर्यटनस्थळ हळूहळू सुरू करण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळ सुरू करण्यात आली आहेत. पर्यटन स्थळ सुरू करत असताना कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात आहे. पर्यंतनस्थळांवर तिकीट विक्री बंद असून ऑनलाइन पद्धतीने तिकीट काढवे लागत आहे. पर्यटन स्थळांवर गेल्यावर ऑक्सिमिटर आणि थर्मलगनने शारीरिक तपासणी केली जात आहे. त्यानंतर गर्दी होणार अशा पद्धतीने पर्यटकांना पर्यटनस्थळांवर सोडले जात आहे.

दोन महिन्यांपासून पर्यटन व्यवसायिकांचा होता पाठपुरावा

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळ सुरू करावीत यासाठी पर्यटन आधारित व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी सरकार दरबारी आपल्या मागण्या मांडल्या होत्या. वेळोवेळी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करण्यात आला. काही दिवसांपूर्वी ऑनलाइन आंदोलन करत पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या अडचणी मांडल्या. यात हॉटेल व्यावसायिक, कार चालक, गाईड, दुकानदार, डोलीवाले इत्यादी व्यावसायिकांच्या अडचणी मांडण्यात आल्या होत्या. अखेर राज्यसरकारने पर्यटनस्थळ सुरू करण्यास परवानगी दिल्याने व्यावसायिकांनी आणि पर्यटकांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा - सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान, मराठा युवकांचा रोष

हेही वाचा - औरंगाबादमध्ये भाजपवगळता सर्व संघटनांचा 'भारत बंद'ला पाठिंबा

Last Updated : Dec 10, 2020, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.