ETV Bharat / state

निर्यात बंदीमुळे टोमॅटोचे दर गडगडले, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान;पहा ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट

author img

By

Published : Aug 30, 2021, 4:54 PM IST

टोमॅटोला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी टोमॅटो फेकून देत आहेत. उत्पादनाला येणारा खर्च पाहता मिळणारे उत्पन्न शून्य असल्याने हे पाऊल उचलावे लागत असून, जोपर्यंत निर्यात बंदी उठत नाही, तोपर्यंत टोमॅटोला योग्य भाव मिळणार नाही, त्यामुळे केंद्राने निर्णयात बंदी उठवावी अशी मागणी पळशी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या सर्व परिस्थितीबाबत पळशी येथील शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी-

टोमॅटोला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी टोमॅटो फेकून देत आहेत.

औरंगाबाद - योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी टोमॅटो फेकून देत आहेत. येणारा खर्च पाहता मिळणारे उत्पन्न शून्य असल्याने हे पाऊल उचलावे लागत असून, जोपर्यंत निर्यात बंदी उठत नाही, तोपर्यंत टोमॅटोला योग्य भाव मिळणार नाही, त्यामुळे केंद्राने निर्णयात बंदी उठवावी अशी मागणी पळशी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या सर्व परिस्थितीबाबत पळशी येथील शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी-

टोमॅटोला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी टोमॅटो फेकून देत आहेत. ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट

टोमॅटो पिकाला उत्पन्नापेक्षा खर्च जास्त

टोमॅटोच पीक शेतकऱ्यांचे हक्काचे पीक समजले जाते. मात्र, याच पिकाला दर मिळत नसल्याचे दिसून आले आहे. बाजारात पाठवलेला माल विक्री होत नसल्याने तो परत आणणे परवडणारे नाही. टोमॅटो बाजार समिती आवारात किंवा रस्त्याच्या बाजूला फेकूण द्यावा लागत आहे. एक कॅरेट टोमॅटो बाजार विक्रीसाठी पाठवताना, त्यासाठी लागणारी मजुरी, वाहतूक यासाठी शंभर रुपये खर्च येतो. मात्र, बाजारात गेल्यावर 50 ते 60 रुपये मोठ्या मुश्किलीने मिळत आहेत. त्यामुळे टोमॅटो विकावा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

इंधन दर वाढीमुळे वाहतुक महागली

इंधर दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. त्याचा परिणाम शेतीमाल वाहतुकीवर दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी टोमॅटो बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठी कॅरेट मागे 50 रुपयांचा खर्च येत होता. तोच खर्च आता 90 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे टोमॅटो वाहतूक महागली आहे. त्याउलट बाजार पेठेत मिळणारा भाव अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पळशी येथील शेतकऱ्यांनी नांदेड येथे ट्रक भरून टोमॅटो पाठवला होता. तिथे बाजार भाव न मिळाल्याने तो पुढे दुसऱ्या जिल्ह्यात पाठवण्यात आला. मात्र, तिथेही भाव मिळाला नसल्याने पाठवलेला टोमॅटो परत आणणे परवडणार नसल्याने शिल्लक टोमॅटो रस्त्यात फेकून द्यावा लागला अशी माहिती पळशी येथील शेतकरी योगेश पळसकर यांनी दिली.

निर्यात बंदीमुळे विक्रीवर परिणाम

महाराष्ट्रातून टोमॅटोची बाहेर देशात निर्यात होते. ज्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशांमध्ये टोमॅटो पाठवला जातो. त्यामुळे बाजारात टोमॅटोला मोठी मागणी असते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये निर्यात बंदी असल्याने आलेले टोमॅटो विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध होत नाहीये. परिणामी मागणीपेक्षा उत्पादन अधिक झाले आहे. त्यात कोरोनामुळे खाद्य पदार्थ विक्री करणारे हात गाडी, हॉटेल यावर काही निर्बंध लावण्यात आल्यानेही टोमॅटो विक्रीवर परिणाम झाला आहे. यावर आता निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी नेते नाना पळसकर यांनी केली आहे.

सरकारने मदत करावी

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउननंतर अनेक युवक शेती व्यवसायाकडे वळले आहेत. त्यात अस संकट आल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण होण्याची भीती असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी. अन्यथा युवक शेतकरी आत्महत्या करण्याची भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी पळशी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.