ETV Bharat / state

बँकेतील रांगा टाळण्यासाठी बँकेने राबवला 'हा' उपक्रम... - लाॅकडाऊन बातमी

केंद्र सरकारने जनधन खात्यात टाकलेले पैसे परत जातील या भीतीने अनेक नागरिकांनी पैसे काढण्यासाठी बँकेसमोर गर्दी केल्याचे दिसून आले. यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सच्या नियमांची नागरिकांनी पायल्ली केल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना आपले पैसे मिळावे आणि लोकांनी गर्दीही करू नये यासाठी वेरुळ येथे असलेल्या आसपासच्या गावांमध्ये महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी स्वतः पैसे घेऊन जात आहेत.

to-prevent-the-queue-in-the-bank-the-bank-implemented-this-initiative-dot-dot-dot

author img

By

Published : Apr 10, 2020, 6:35 PM IST

औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महिलांच्या जनधन खात्यात 500 रुपये जमा केले. ही रक्कम काढण्यासाठी अनेक ठिकाणी महिलांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती अधिक निर्माण झाली आहे. मात्र, यावर औरंगाबादच्या वेरूळ येथील महाराष्ट्र बँकेने "बँक आपल्या गावी" योजना राबवत होणाऱ्या गर्दीला आळा घातला.

बँकेतील रांगा टाळण्यासाठी बँकेने राबवला 'हा' उपक्रम...

हेही वाचा- धारावीतील डोअर टू डोअर स्क्रिनिंगला शनिवारपासून सुरुवात

केंद्र सरकारने जनधन खात्यात टाकलेले पैसे परत जातील या भीतीने अनेक नागरिकांनी पैसे काढण्यासाठी बँकेसमोर गर्दी केल्याचे दिसून आले. यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सच्या नियमांची नागरिकांनी पायल्ली केल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना आपले पैसे मिळावे आणि लोकांनी गर्दीही करू नये यासाठी वेरुळ येथे असलेल्या आसपासच्या गावांमध्ये महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी स्वतः पैसे घेऊन जात आहेत. सोशल डिस्टन्सचे पालन करुन नागरिकांना त्यांचे पैसे देत आहे.

नागरिकांच्या जनधन खात्यात पैसे येताच गर्दी होऊ नये यासाठी वेरुळ येथील महाराष्ट्र बँकेने विशेष काळजी घेतली. बँके समोर एक मीटर अंतरावर वर्तुळ करुन खातेदारांना आपला नंबर येईपर्यंत त्यावर उभे राहायला सांगितले. त्यामुळे सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करत सेवा देण्यात आली. इतकंच नाही तर ग्रामीण भागातील खातेदारांनी प्रवास करू नये यासाठी 'बँक आपल्या गावी' संकल्पना राबवण्यात येत आहे.

बॅंकेचे कर्मचारी गावामध्ये जाऊन खातेधारकांना पैशाचे वाटप करीत आहेत. नोटांमुळे विषाणूंचा प्रसार होऊ शकतो त्यामुळे खबरदारी म्हणून खातेधारकांना चिल्लर देण्यात येत आहे. खातेधारकांनीही चिल्लरची पिशवी डेटॉलच्या पाण्यात टाकून नाणी स्वच्छ धुऊन वापरली.

वेरुळच्या महाराष्ट्र बँकेने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मदत मिळेल. खातेदारांना त्यांचे पैसेही मिळतील असा विश्वास वेरुळ महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर अजय केंद्रे यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.