ETV Bharat / state

सीसीटीव्हीच्या मदतीने दोन अट्टल चोर गजाआड, जिन्सी पोलिसांची कारवाई - औरंगाबाद चोरी बातमी

जिन्सी गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने 2 अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या जवळून 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करत विविध पोलीस ठाण्यात दाखल असेलेले 3 गुन्हे उघडकीस आणले आहे.

aurangabad
सीसीटीव्हीच्या मदतीने दोन अट्टल चोरट्यांना अटक
author img

By

Published : Dec 29, 2019, 12:41 PM IST

औरंगाबाद - सीसीटीव्हीच्या मदतीने जिन्सी गुन्हे शोध पथकाने 2 अट्टल गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्या जवळील ४ लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. त्यांच्यावरील जिन्सी पोलीस ठाणे येथील १ गुन्हा, फुलंब्री पोलीस ठाण्यातील १ आणि जवाहर नगर पोलीस ठाण्यातील 1 असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आणण्यात जिन्सी पोलिसांना यश आले आहे. सचिन सुधाकर दवंगे पाटील (वय 27) आणि उमेश देविदास मुळे (वय 45) दोघेही राहणार कैलासनगर औरंगाबाद, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सीसीटीव्हीच्या मदतीने दोन अट्टल चोरट्यांना अटक

27 डिसेंबरला कैलास नगर भागात राहणाऱ्या संदीप किशोर सरीन यांनी त्यांचा 4 लाख रुपये किंमतीचा 407 टेम्पो अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना शाहराजवळील टोल नाके परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये 2 संशयित व्यक्ती दिसून आले. त्यावरून पोलिसांनी सचिन व उमेश या दोघांना ताब्यात घेवून विचारपूस केली. यावेळी त्या दोघांनी संदीप सरीन यांचा 407 टेम्पो, फुलंब्री येथील शेषराव यांची 20 हजार किमतीची पल्सर, व जवाहरणगर पोलीस ठाण्यात घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या जवळून 4 लाख 20 हजार 70 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत विविध पोलीस ठाण्यात दाखल असेलेले 3 गुन्हे उघडकीस आणले आहे. ही कारवाईही जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके, रफी शेख, संपत राठोड, पोलीस हवालदार व्ही एस काकडे यांच्या पथकाने केली आहे.

Intro:सीसीटीव्ही च्या मदतीने जिन्सी गुन्हे शोध पथकाने दोन अट्टल गुन्हेगाराला अटक केली असून त्यांच्या जवळील मुद्देमाल जप्त करत जिन्सी पोलीस ठाणे येथील एक फुलंब्री पोलीस ठाणे येथील 1व जवाहर नगर पोलीस ठाणे येथील एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणण्यात जिन्सी पोलिसांना यश आले आहे

Body:जिन्सी गुन्हे शोध पथकाने अट्टल गुन्हेगार सचिन दवंगे व उमेश मुळे यास अटक करून जिन्सी आणि जवाहर नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेली तीन गुन्हे उघडकीस आणले आहे,27 डिसेंम्बर रोजी कैलास नगर भागात राहणाऱ्या संदीप किशोर सरीन यांचा 407 टेम्पो ज्याची किंमत चार लाख असून तो अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल केली असता या गुन्ह्याचा तपास करत असताना शाहराजवळील टोल नाके परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये दोन संशयित व्यक्ती दिसून आले त्यावरून
सचिन सुधाकर दवंगे पाटील (वय 27 वर्ष धंदा मजुरी रा.कैलास नगर औरंगाबाद) व उमेश देविदास मुळे (वय 45 वर्ष रा कैलासनगर औरंगाबाद) यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी संदीप सरीन यांचा 407 टेम्पो,फुलंब्री येथील शेषराव यांची 20 हजार किमतीची पल्सर, व जवाहरणगर पोलीस ठाण्यात घर फोडी केल्याची कबुली दिली असून त्यांच्या जवळून चार लाख वीस हजार सत्तर रुपय किमतीचा मुद्देमाल जप्त करत विविध पोलीस ठाण्यात दाखल असेलेले तीन गुन्हे उघडकीस आणले आहे ही कारवाईही कारवाई जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके,रफी शेख, संपत राठोड, पोलीस हवालदार व्ही एस काकडे यांच्या पथकाने केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.