औरंगाबाद - जिल्ह्यातील वेरूळ लेणी जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. मात्र ही नुसती लेणी नसून इथे तीन धर्मांचा एकत्र दर्शन होते. बौद्ध, हिंदू आणि जैन अशा तीन धर्मांच्या संस्कृतीचं एकत्र दर्शन घडवणारे हे एकमेव स्थान मानले जाते. (National Tourism Day 2022 ) तर दुसरीकडे यामध्ये असलेली कैलास लेणी ही मानवनिर्मित (Ellora caves) नसून देवांनी स्वतः निर्माण केलेली कलाकृती आहे अशी आख्यायिका देखील परिचित आहे.
अस पडल एलोरा हे नाव
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी एलोरा केवज म्हणून जगभरात ओळख निर्माण झाली. खरे पाहिले तर कन्नड शब्द इलुरा म्हणून या परिसराला ओळखले जायचे. मात्र मराठीत याला वेरूळ असे उच्चारला जात होते. (Where is Ellora caves) इंग्रजांच्या काळामध्ये या परिसराचा नाव घेताना त्यांना अडचण येत होती म्हणून इंग्रज कन्नड शब्द इलुरा असा असल्याने त्याला एलोरा असं संबोधू लागले. आणि त्यातूनच एलोरा हे नाव देश-विदेशात पोहोचले. इंग्रजांमुळे विदेशात या परिसराला एलोरा अस नाव देण्यात आले. त्यामुळे आजही देश-विदेशात एलोरा केवज अशी ओळख या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीला मिळाली.
तीन धर्म संस्कृतींचे दर्शन घडवते वेरूळ
वेरूळ परिसरात एकूण 34 लेण्या आहेत. यामध्ये लेणी क्र 1 ते 12 हे बौद्ध संस्कृती, लेणी क्र 12 ते 30 हिंदू संस्कृती तर लेणी क्र 31 34 जैन संस्कृतीचे दर्शन घडते. जगामध्ये या तीन संस्कृतीचे एकत्र दर्शन घडवणारे वेरूळ लेणी ही एकच आहे. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये डेसॉल्ट दगडात या सर्व कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. द्रविडीयन पद्धतीत साकारण्यात आलेल्या लेण्यांची निर्मिती इ.स 600 ते 1000 या काळात निर्माण झाल्याचे सांगितले जाते. व्यापारी मार्गावर असल्याने या लेण्या पहिल्यापासूनच प्रसिद्धी झोतात होत्या. धर्म वाढवण्यासाठी लेण्यांच्या माध्यमातून त्याकाळी प्रचार केला जात होता. त्यातूनच या लेण्यांची निर्मिती झाल्यात इतिहासतज्ञ डॉ. संजय पाईकराव यांनी सांगितले.
अशी आहे लेणीची रचना
वेरूळ लेणी परिसरात एक ते बारा या लेण्यांमध्ये बुद्ध यांच्या शिल्पातून तत्वज्ञानाचा ज्ञान देण्यात आला आहे. बुद्ध, बोधीसत्व, बोधीशक्ती यांच या शिल्पातून तत्वज्ञान देण्यात आला आहे. अतिशय उत्तम आणि कलात्मक असे ज्ञान आणि माहिती या लेण्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. एक तळे दोन ताळी आणि तीन ताळी अशा या लेण्या साकारण्यात आले आहेत. लेणी क्रमांक 12 ते 30 यामध्ये हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आला आहे यामध्ये विशेषतः शिवाची आराधना करणारा स्थान म्हणून या लेण्यांकडे पाहिल्या जातात शिव पार्वती जीवनावर आधारित कथा या लेण्यांमध्ये साकारण्यात आली आहे विशेषतः लेणी क्रमांक 16 यामध्ये एक विशेष अशी शक्ती असल्याचे देखील बोलले जात आहे.
यामध्ये छोटा कैलास म्हणून देखील लेणी प्रसिद्ध आहे
रामायण आणि महाभारतात चापट युद्धाचा प्रसंग दर्शविण्यात आलेला आहे. रावणाने पर्वत हलवला असा देखील पट येथे नमूद करण्यात आला आहे. कामशिल्प पेंटिंग अशा विविध कला येथे साकारण्यात आले आहे. तर लेणी क्रमांक 334 यामध्ये भगवान पार्श्वनाथ भगवान महावीर यांच्या पर्यंतच्या जैन कीर्तनकारांचा शिल्पही साकारण्यात आला आहे. तरी, यामध्ये छोटा कैलास म्हणून देखील लेणी प्रसिद्ध आहे.
सर्वात सुंदर लेणी ही फक्त वेरुळ येथे आढळते
या सर्व लेण्यांमध्ये विशेषतः जैन पेंटिंग आढळतात समाजाचा राहणीमान आणि वाटचाल याबाबत चित्रण यामध्ये करण्यात आले आहे. देशाचे रक्षण करणारे यांचे कोरलेले शिल्प देवाप्रमाणे स्थान दिल्यासारखे दर्शवण्यात आले आहे. अंबिका एक शनीचे सुंदर शिल्प यामध्ये सर्वांना आकर्षून घेते. भारतातील जैन समाजावर आधारित सर्वात सुंदर लेणी ही फक्त वेरुळ येथे आढळते असही पाईकराव यांनी सांगितले.
लेणी क्र 16 मानली जाते चमत्कारिक
वेरूळ लेणीमध्ये सर्वात वेगळी ओळख आहे ती कैलास लेणी म्हणजेच लेणी क्र 16 ला. ही लेणी अवकाशातून पहिली तर दृश्य एका रथाप्रमाणे दिसून येते. एक मोठा रथ आहे आणि तो रथ हत्ती ओढत आहेत असे दृश्य अवकाशातून दिसते. त्यामुळे ही लेणी अतिशय विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. विशेषता या लेणीची आख्यायिका देखील आहे. आधी कळस आणि मग पाया असा निर्मिती या लेणीच्या झाल्याचे बोलले जाते. ही लेणी म्हणजे एक चमत्कार असल्याचे देखील सांगण्यात येते.
वेगवेगळ्या आख्यायिका आहेत प्रसिद्ध
कैलास लेणी बाबत अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. यामध्ये कथाकल्पतरू या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, शिव आणि पार्वती विमानाने प्रवास करत असताना त्यावेळी या ठिकाणी भक्त पूजा करत होते. त्यावेळेस भगवंतांनी त्याला दर्शन दिले आणि भक्तांनी या ठिकाणी अखंड मंदिर असावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यावरून पैठण येथील काकस नावाच्या स्थापत्य म्हणजे कारागिराला वरदान देण्यात आले आणि त्याने एका रात्रीत कैलास लेणीची निर्मिती केली, अशी आख्यायिका आहे.
अनेक आख्यायिका या लेणीच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत
दुसरीकडे जर्मन अभ्यासक आणि महिला पत्रकार क्रिस्टल प्लीज यांना विशेष कैलास लेणीचे आकर्षण आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही लेणी मानव निर्मित नसून देवदूताने त्याची निर्मिती केली आहे. मागील दहा ते बारा वर्षापासून त्या या ठिकाणी दरवर्षी येतात आणि त्या बाबतचा अभ्यास करतात. तेथे आल्यावर एक वेगळी ऊर्जा मिळते. देवाला भेटल्याचा भास होतो आणि त्यामुळेच ही लेणी मानवनिर्मित असू शकत नाही असही त्यांचे म्हणणे आहे. अशा अनेक आख्यायिका या लेणीच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. अशी माहिती इतिहास अभ्यासक डॉ. संजय पाईकराव यांनी दिली.
हेही वाचा - आता शनिवार-रविवारीही आरटीओ खुले;ईटीव्ही भारतच्या वृत्ताची दखल