ETV Bharat / state

पैठणमध्ये गोदावरीत पोहायला गेलाला मुलगा गेला वाहून; शोधकार्य सुरू - jaikwadi dharan

दोघे मित्र गोदावरीच्या पात्रात पोहण्यास गेले. त्यांना पोहता येत नसल्याने दोघेही वाहू लागले. मुले वाहून जात असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातील एक मुलगा वाहून गेल्याची घटना पैठण तालुक्यात घडली.

शोधकार्य सुरु
author img

By

Published : Aug 17, 2019, 9:42 PM IST

औरंगाबाद - गोदावरी पात्रात पोहण्यासाठी गेलेला एक मुलगा वाहून गेल्याची घटना शनिवारी दुपारी पैठण तालुक्यात घडली. नदी पात्रात दोन मित्र पोहण्यासाठी गेले होते. त्यातील एकजण वाहून गेला तर एकाला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश मिळाले आहे. जिल्हा प्रशासनाने वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेणे सुरू केले आहेत.

गोदावरी नदी पात्रात मुलगा गेला वाहून

फैसल फिरोज शेख (वय १६) असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात ५ हजार ७८२ क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैठण परिसरातील गोदावरी नदी भरून वाहत आहे. दरम्यान शनिवारी दुपारी शहरातील पॉवर हाऊस भागात राहणारे दोघे मित्र शनी मंदिराच्या पाठीमागील गोदावरी पात्रात पोहण्यासाठी गेले. विशेष म्हणजे या दोघांनाही पोहता येत नसल्याचे बोलले जाते. गोदावरी नदीतील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने पाण्यात उडी मारताच ते वाहू लागले. स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी गोदापात्रात उड्या मारून दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी फैसल शेख हा वाहून गेला. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. फैसलचा शोध घेणे सुरू आहे. पाण्याचा जोर मोठ्या प्रमाणात असल्याने फैसल दूरपर्यंत वाहून गेल्याच अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Intro:गोदावरी पात्रात पोहण्यासाठी गेलेला एक मुलगा वाहून गेल्याची घटना पैठण तालुक्यात घडली. गोदावरी नदी पात्रात दोन मित्र पाहण्यासाठी गेले असताना एक जण वाहून गेला तर एकाला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश मिळालं आहे. वाहून गेलेल्या मुलाचा शोध जिल्हाप्रशासनाने सुरू केला आहे. Body:शनिवारी दुपारी ही घटना घडली असून. फैसल फिरोज शेख वय वर्ष १६, असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. जायकवाडी धरणातून नदी पात्रात दोन दिवसांपूर्वीच पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वाहत पाणी पाहून पाण्यात जाण्याचा मोह मुलांच्या जीवावर उठला.Conclusion:नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जयकवडू धरणं पूर्णक्षमतेने भरलं. धरणातून गोदावरी पात्रात ५७८२ क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू असल्याने पैठण परिसरात गोदावरी नदी भरून वहात आहे. दरम्यान आज दुपारी शहरातील पॉवर हाऊस भागात राहणारे दोघे मुले शनी मंदिराच्या पाठीमागील गोदावरी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. विशेष म्हणजे या दोघांनाही पोहता येत नसल्याचं बोललं जातं. गोदावरीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने पाण्यात उडी मारताच ते वाहू लागले. स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच नागरीकांनी गोदापात्रात उड्या मारून दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी फैसल फिरोज शेख (१६) यास वाचविण्यात अपयश आले. अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले असून वाहून गेलेल्या फैजल फिरोजचा शोध घेत आहे. पाण्याचा जोर मोठ्या प्रमाणात असल्याने फिरोज दूर पर्यंत वाहून गेल्याच अंदाज आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.