ETV Bharat / state

गरज नसताना रेमडेसिवीर इंजेक्शन घेणे धोकादायक - रेमडेसिवीरचा फुफ्फसावर दुष्परिणाम

कोरोना रुग्णांमध्ये जसजशी वाढ होत आहे, तसतसे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढत चालली आहे. मागील काही दिवसांमध्ये रुग्ण वाढले आहेत. लक्षण नसलेली रुग्ण संख्या अधिक असल्याचं बोललं जातं असलं, तरी देखील रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागमी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचं नेमकं कारण काय आहे? याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट

गरज नसताना रेमडेसिवीर इंजेक्शन घेणे धोकादायक

author img

By

Published : Apr 16, 2021, 8:28 PM IST

Updated : Apr 17, 2021, 9:40 AM IST

औरंगाबाद - कोरोना रुग्णांमध्ये जसजशी वाढ होत आहे, तसतसे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढत चालली आहे. मागील काही दिवसांमध्ये रुग्ण वाढले आहेत. लक्षण नसलेली रुग्ण संख्या अधिक असल्याचं बोललं जातं असलं, तरी देखील रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागमी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचं नेमकं कारण काय आहे? याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट

गरज नसताना रेमडेसिवीर इंजेक्शन घेणे धोकादायक

रेमडेसिवीर नेमकं काय आहे?

कोराना रुग्णांना वाचवणारे इंजेक्शन म्हणून रेमडेसिवीर सध्या चर्चेत आहे. मात्र रेमडेसिवीर नेमकं आहे काय? याबाबत अनेकांना संभ्रम आहेत. रेमडेसिवीर सुरुवातीला हेपेटाइटीसचे औषध म्हणून बनवण्यात आलं होतं. एका अमेरिकन कंपनीने या औषधाची निर्मिती केली होती. 2014 मध्ये इबोला वायरसवर उपचारासाठी या औषधांमध्ये बदल करून त्याचा वापर करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर या औषधावर नव्याने अभ्यास सुरू झाला. त्यात श्वसनाच्या त्रासावर, तसेच फुफ्फुसाला संसर्ग झाल्यास ते उपयोगी ठरत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी या इंजेक्शनच्या वापरास परवानगी देण्यात आली.

रेमडेसिवीरची गरज कधी पडते

कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात आहे. मात्र तज्ञ डॉक्टरांच्या मते गरज असल्यावरच इंजेक्शन दिले पाहिजे, अन्यथा त्याचे दुष्परिणाम दिसून शकतात. सतत ताप आल्यास, रक्ताच्या चाचणीत संसर्ग आढळल्यावर, एचआरसिटीचा स्कोर किमान नऊ पेक्षा जास्त असल्यावर, रुग्णाचे वय खूप जास्त आणि आधीपासूनच काही व्याधी त्याला असल्यास हे औषध वापरले जाते. मात्र गरज नसताना, फारसा संसर्ग नसतानाही रेमडेसिवीर औषधाचा वापर सुरू असल्याचं समोर येत आहे. गरज नसताना औषध घेतल्यास, लिव्हरवर याचा परिणाम होऊ शकतो, इतरही त्रास जाणवू शकता, त्यामुळे गरज असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन रेमडेसिवीरचा वापर करावा असं मत आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी व्यक्त केलं आहे.

राज्यात रेमडेसिवीरचा सर्रास वापर

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक शहरात आता रुग्णालयात बेड मिळत नाही अशी अवस्था आहे. त्यात कोरोनाबाधित रुग्णांना जीवनदान देणाऱ्या रेमडेसिवीर औषधांचा सुद्धा तुटवडा जाणवत आहे. कोरोना झाल्यावर रुग्ण दाखल होताच सगळीकडे रेमडेसिवीर देण्याची घाई केली जात आहे. डॉक्टर तर कधी रुग्णाचे नातेवाईक कुठलीही शहानिशा न करता इंजेक्शन देण्यासाठी घाई करतात. त्यामुळे राज्यात इंजेक्शनचा तुटवडा जाणवायला सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनासाठी रुग्णांच्या नातेवाईकांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीरची काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून, साधारणत दीड हजाराला मिळणारे इंजेक्शन, दहा ते पंधरा हजारांना विक्री केले जात आहे. राज्याला सध्या 50 हजारांच्या जवळपास रेमडेसिवीर रोज लागत आहेत. जवळपास 50 ते 60 टक्के रुग्णांमध्ये लक्षणं आढळत नाहीत. ज्या रुग्णांना गरज नाही अशा रुग्णांनी रेमडेसिवीर इंजेक्शन घेणे टाळावे असे आवाहन आता करण्यात येत आहे.

रेमडेसिवीरच्या वितरणाबाबत योग्य नियोजन करण्याची गरज

रेमडेसिवीर इंजेक्शनाबाबत आता कडक धोरण अवलंबण्याची गरज निर्माण झाली आहे. इंजेक्शन घेण्यासाठी मान्यताप्राप्त डॉक्टरांची चिठ्ठी सक्तीची करायला हवी. औषध घेण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनातर्फे जाहीर केलेल्या औषधी दुकानातूनच इंजेक्शनची विक्री व्हावी, असे काही निर्बंध लावल्यास औषधांचा तुटवडा जाणवणार नाही आणि काळा बाजारीवर आळा बसेल, अस मत वैद्यकीय अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे. या संदर्भात आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

हेही वाचा - मुंबईत ऑक्सिजनसाठी नोडल अधिकारी, ६ जण नियंत्रित करणार मुंबईचा ऑक्सिजन

Last Updated : Apr 17, 2021, 9:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.