गंगापूर (औरंगाबाद) : सुनिल प्रकाश जमधडे असे मयत तरुणाचे नाव असून, अक्षय बापुसाहेब वीर (वय 21 वर्ष, रा. पान रांजणगांव (खुरी) ता. पैठण) असे ताब्यात घेतलेल्या पहिल्या आरोपीचे नाव आहे. गणेश गोपीनाथ जगदाळे (राहणार- पानरांजणगाव, ता. पैठण) असे गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपींनी तरुणाला दारू पाजून गळा आवळून त्याचा खून केला. यानंतर मयताची ओळख मिटविण्यासाठी त्याचा चेहरा विद्रुप केला. दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली होती.
फरार आरोपीस घेतले ताब्यात : मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी गणेश गोपीनाथ जगदाळे हा त्याच्या घरी पानरांजणगाव येथे आलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. याआधारे स्थानिक गुन्हे शाखेने पणरांजणगाव येथे आरोपीचा शोध घेतला असता आरोपी गणेश गोपीनाथ जगदाळे हा त्याच्या राहत्या घरी मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता मयत सुनील प्रकाश जमदाडे यास आरोपी अक्षय बापूसाहेब वीर आणि आरोपी गणेश गोपीनाथ जगदाळे या दोघांनी मारहाण करून रुमालाने गळा आवळून त्याचा खून केला. यानंतर मयताचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केल्याची कबुली आरोपी गणेश गोपीनाथ जगदाळे याने दिला. यावरून गंगापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
यांनी केली कारवाई : ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, श्रीमंत भालेराव, प्रमोद खांदेभराड, संजय घुगे, नामदेव सिरसाठ, वाल्मीक निकम, गणेश गांगवे, नांगरे यांनी केली आहे. याप्रकरणी अधिक तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते हे करत आहेत. या खून प्रकरणात आणखी काही पुरावे मिळतात का, याचा पोेलीस कसून शोध घेत आहे.
औरंगाबादमध्ये दहशत गुन्हेगारांची की पोलिसांची? स्वत:च्या नावाची दहशत माजवण्यासाठी एका आरोपीने 4 जानेवारी, 2023 रोजी रात्री रशिदपुरा येथे हॉटेलची तोडफोड करत, हॉटेल मालकाच्या दुचाकीला आग लावली. इतकेच नाही तर जळत असलेल्या दुचाकीचा व्हिडिओ स्टेटस म्हणून ठेवला. या घटनेवरून औरंगाबादमध्ये गुन्हेगारांची हिम्मत किती वाढली आहे, याचा अंदाज येता. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दखल करत तपासाला सुरुवात केली. शेख नासेर उर्फ इंता असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक केली. मात्र, औरंगाबाद शहरात घडत असलेल्या अशा घटनांनी पोलीस विभागाची अब्रु वेशीला टांगल्याचे स्पष्ट जाणवत आहे.