ETV Bharat / state

Sudhir Mungantiwar Criticized Lalu : लालू यादव यांच्या मोदी यांच्यावरील ‘त्या’ विधानाने संताप; सुधीर मुनगंटीवार म्हणाले... - भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Criticized Lalu : लालू प्रसाद यादव यांनी मुंबईत येताच भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. लालू प्रसाद यादव यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानगुटीवर बसायचं आहे, असं धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या या विधानावर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Sudhir Mungantiwar Criticized  lalu
सुधीर मुनगंटीवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 5:21 PM IST

प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Sudhir Mungantiwar Criticized Lalu : मुंबईत विरोधी पक्षांच्या 'INDIA' आघाडीची आजपासून बैठक सुरू होत आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईतील 'ग्रँड हयात' हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावर आता सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नुसत्या बैठका घेत आहेत. तुमचं नेतृत्व कोण करतंय. तुम्हाला आमच्याशी लढायचं तर एक सेनापती ठरवा? का ठरवत नाही? पंतप्रधान पदाचा उमेदवार, नुसते बोर्ड बॅनर लावतात आणि देशाला अधोगतीला लावतात. तुमचे नेतृत्व कोण करणार, तुम्ही देश कसा पुढे नेणार हे सांगत नाहीत. इंडियाची मुंबईतील बैठक म्हणजे गंमत आहे. लालु यादव म्हणतात मला मोदींच्या मानगुटीवर बसायचं आहे. मात्र ही मुंबई आहे, इथून हे तिरडीवर जातील. यांचा एकच मिनिमम कॉमन प्रोग्रॅम आहे, तो म्हणजे मोदी हटाव अशी टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. (Sudhir Mungantiwar On lalu Prasad Yada)

शरद पवार यांचा टोला कोणाला : या आधी ईडी कारवाई बाबत शरद पवार (Sharad Pawar) टीका करत होते. मात्र काल पवार म्हणाले की, मोदी यांनी आरोप केले तर चौकशी व्हायला हवी, होय चौकशी होणार आहे. काल त्यांच्या बाजूला उद्धव साहेब बसले होते. म्हणून तर ते म्हणाले नाही ना, असाही प्रश्न आम्हाला पडलाय. अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. काल एक नेता म्हणाला मुंबई तोडणार, कुणाच्या माईच्या लालची हिंमत आहे? मुंबई तोडायची, हिटलरच्या गोबेल्स सारखी ही नीती आहे आणि हे सगळं सुरू असल्याचं देखील मुनगंटीवार यांनी सांगितलं.

सायरस पुनावाला यांच्यासारखे अनेकांचे मत : शरद पवार यांचे मित्र सायरस पुनावाला यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत पवार यांनी आराम करावा असं म्हटलं, त्यावर बोलताना शरद पवार यांनी आराम करावा ही त्यांच्या पक्षातील लोकांचीही इच्छा होती, मात्र अनेकांना मोह सुटत नाही अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. तर अजित पवार यांच्या फाईल उपमुख्यमंत्री फडणवीस आणि नंतर मुख्यमंत्री यांच्याकडे जातात यावर बोलताना फायलींचा प्रवास अंकुश ठेवण्यासाठी नाही तर, समन्वय असावा म्हणून फाईल या ठिकाणाहून प्रवास करून त्या ठिकाणावर जातात. माझ्या पण फाईल जात होत्या असं उत्तर मुनगंटीवार यांनी दिलं. तर आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात केलेल्या आंदोलना बाबत बोलताना भारत रत्न परत घेता येत नसतो, मला इतकंच यावर बोलायचं आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी बोलणं टाळलं.

हेही वाचा -

  1. Sudhir Mungantiwar : वनरक्षक परीक्षा रद्द होणार नाही; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
  2. Sudhir Mungantiwar : 'माझ्याही गाडीचे कुणीतरी नटबोल्ट काढले होते, घातपाताचा प्रयत्न पण...'
  3. Sudhir Mungantiwar On Kirit Somaiya : संधी आहे, संधीचे सोन करा!; किरीट सोमैया प्रकरणी मुनगंटीवार यांचा अनिल परब यांना सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.