ETV Bharat / state

औरंगाबादमधून काँग्रेसतर्फे सुभाष झांबड यांना उमेदवारी

औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत सुभाष झांबड यांची मुख्य लढत असणार आहे.

सुभाष झांबड
author img

By

Published : Mar 23, 2019, 10:06 AM IST

औरंगाबाद - काँग्रेसने औरंगाबादमधून आमदार सुभाष झांबड यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत सुभाष झांबड यांची मुख्य लढत असणार आहे.

सुभाष झांबड सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आहेत. औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सुभाष झांबड यांच्यासह प्राध्यापक रवींद्र बनसोड उत्सुक होते. त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील काँग्रेसकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेस पक्षातील स्थानिक नेत्यांचा विरोध असल्याने अखेर सुभाष झांबड यांचे पारडे जड पडले.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. गेल्या ३ वर्षांपासून सुभाष झांबड लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. मात्र, स्थानिक नेत्यांसोबत झालेले मतभेद पाहता त्यांची उमेदवारी रद्द होईल अस बोलले जात होते. त्याचबरोबर प्राध्यापक रवींद्र बनसोड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली होती. ऐनवेळी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांना देखील पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी गळाला लावण्याचा प्रयत्न केला.

हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे आमदार असले तरी या वेळेस शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात ते लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार होते. उमेदवारी कोणाला मिळणार हा प्रश्न निर्माण होत असताना अखेर काँग्रेसने सुभाष झांबड यांच्या नावाची घोषणा केली. ग्रामीण भागात झांबड यांनी जनसंपर्क देखील वाढवला होता. आता या सगळ्या तयारीचा फायदा सुभाष झांबड ला होईल का याकडेच औरंगाबादच्या मतदारांचे लक्ष लागले आहे.

Intro:औरंगाबाद मधुन काँग्रेसने आमदार सुभाष झांबड यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत सुभाष झांबड यांची मुख्य लढत असणार आहे.

Body:सुभाष झांबड सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आहेत. औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सुभाष झांबड यासोबतच प्राध्यापक बनसोड उत्सुक होते. त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील काँग्रेसकडून लोकसभा लढवण्याचे इच्छुक होते, मात्र हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेस पक्षातील स्थानिक नेत्यांचा विरोध असल्याने अखेर सुभाष झांबड यांचे पारडे जड पडलं.

Conclusion:औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. गेल्या तीन वर्षांपासून सुभाष झांबड औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. मात्र स्थानिक नेत्यांसोबत झालेले मतभेद पाहता त्यांची उमेदवारी रद्द होईल अस बोललं जात होत. त्याचबरोबर शहरातील प्रसिद्ध प्राध्यापक बनसोड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली होती. ऐनवेळी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांना देखील पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी गळाला लावण्याचा प्रयत्न केला, हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे आमदार असले तरी या वेळेस शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात ते लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. मात्र काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीला विरोध होता. उमेदवारी कोणाला मिळणार हा प्रश्न निर्माण होत असताना अखेर काँग्रेसने सुभाष झांबड यांच्या नावाची घोषणा केली. सुभाष झांबड हे गेल्या तीन वर्षांपासून औरंगाबाद लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. ग्रामीण भागात त्यांनी जनसंपर्क देखील वाढवला होता. आता या सगळ्या तयारीचा फायदा सुभाष झांबड ला होईल का याकडेच औरंगाबादच्या मतदारांचे लक्ष लागले आहे.

( सुभाष झांबड यांचं बाईट मिळाल्यावर अपलोड करतो तोपर्यंत स्टॉक फोटोवर बातमी वापरावी) फोटो on whats app..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.