ETV Bharat / state

बिस्कीट खाल्ल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; संत ज्ञानेश्वर विद्यालयातील महाराज पोलिसांच्या ताब्यात - संत ज्ञानेश्वर विद्यालय

चोरून दोन बिस्कीटे खाल्ली म्हणून एका चिमुकल्याला अमानुष मारहाण झाल्याची घटना औरंगाबादच्या निल्लोड गावात घडली आहे.

रामेश्वर महाराज
author img

By

Published : Jul 17, 2019, 7:53 PM IST

औरंगाबाद - चोरून दोन बिस्कीटे खाल्ली म्हणून एका चिमुकल्याला अमानुष मारहाण झाल्याची घटना औरंगाबादच्या निल्लोड गावात घडली आहे. निल्लोडच्या माऊली वारकरी संस्थेच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयातील हा प्रकार आहे. या प्रकरणात पोलिसांनी रामेश्वर महाराज नावाच्या महाराजाला ताब्यात घेतले आहे.

बिस्कीट खाल्ल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण

दोन बिस्कीटे चोरल्याची शिक्षा या मुलाला अमानुषपणे भोगावी लागली आहे. ११ वर्षीय निरंजन जाधवला भूक लागली म्हणून त्याने आपल्या एका मित्रासोबत मिळून ५ रुपयांचा बिस्कीट पुडा जवळ ठेवला होता. त्यातील २ बिस्किटे घेवून या मुलाने पुडा तिथे ठेवून सुद्धा दिला. मात्र, महाराजांना हे कळताच त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी निरंजनला बोलावून बेदम मारहाण केली. स्पिकरच्या वायरने निरंजनच्या पाठीवर मारहाण करण्यात आली. यात निरंजनच्या डोक्याला सुद्धा दुखापत झाली. हे सगळं झाल्यावरही त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेले नाही.

रविवारी निरंजनची आई वैशाली जाधव त्याला भेटायला गेल्यावर मुलाने रडत हा घडलेला प्रकार आईला सांगितला. मारहाण इतक्या अमानुषपणे केली गेली की ते सांगतांना तो घाबरत होता. महाराज नेहमीच मुलांना अशी मारहाण करतात, असे निरंजनने सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर निरंजनची आईसुद्धा घाबरली.
याची तक्रार निरंजनच्या आईने पोलिसात दिली. त्यावरून रामेश्वर महाराजाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. झालेला प्रकार संतापात केल्याची कबूलीही महाराजांनी दिली आहे. या शाळेत यापूर्वीही मुलांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्याचे कळते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे.

Intro:चोरून दोन बिस्कीटं खाल्ली म्हणून एका चिमुकल्याला अमाऩुष मारहाण झाल्याची घटना औरंगाबादच्या निल्लोड गावात उघड झाली आहे, निल्लोडच्या माऊली वारकरी संस्थेच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयातील हा प्रकार आहे, या प्रकरणात पोलिसांनी रामेश्वर महाराज नावाच्या या महाराजाला ताब्यात घेतलं आहे.
Body:दोन बिस्कीटं चोरल्याची शिक्षा या मुलाला अमानुषपणे भोगावी लागली आहे, चौथ्या वर्गात शिकणारा 8 वर्षांचा निरंजन भूक लागली म्हणून आपल्या एका मित्रासोबत मिळून त्यानं 5 रुपयांचा एका विद्यार्थ्याच्या बँग जवळ ठेवलेला बिस्कीटचा पुडा घेतला आणि त्यातील फक्त 2 बिस्किटं घेवून या मुलानं पुडा तिथं ठेवून सुद्धा दिला, मात्र महाराजांना हे कळताच त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी निरंजनला बोलावून त्याला बेदम मारहाण सुरु केली, स्पिकरचे वायरनं निरंजनच्या पाठीवर मारहाण कऱण्यात आली, यात निरंजनच्या डोक्याला सुद्धा दुखापत झाली, हे सगळं झाल्यावरही त्याला उपचारासाठी दवाखाण्यात नेलं नाही, Conclusion:रविवारी निरंजनची आई वैशाली जाधव त्याला भेटायला गेल्यावर मुलानं रडत ही घडलेला प्रकार आईला सांगितला, मारहाण इतक्या अमानुषपणे केली गेली की मारहाण केली हे सांगतांना तो घाबरतोय. महाराज नेहमीच मुलांना असं मारतात असं निरंजन सांगतोय. या सगळ्या प्रकारानंतर निरंजनची आई सुद्धा घाबरलीये, मी मुलाला भेटायला गेली नसती तर हा प्रकार उघड झाला नसता असं सांगताना त्या आईचे ड़ोळे पाणावतात, घरची परिरस्थिती बेताची असल्याने मुलाला आश्रमात टाकले. महाराज मी अनाथांचा नाथ असल्याचं सांगतात, म्हणून मुलाला घरापासून दूर टाकलं असल्याचं निरंजनच्या आईच म्हणणं असून महाराजांवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. या प्रकऱणात रामेश्वर महाराजांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, झालेला प्रकार संतापात केल्याची कबूलीही महाराजांनी दिलीय, मात्र स्वताला महाराज म्हणवून घेणा-या या माणसाला चिमुरड्यांना अशी मारहाण करणं शोभतं का असाही प्रश्न आहे, याशाळेत याआधीही मुलांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्याचं कळतंय, त्यामुळं या सगळ्या प्रकऱणाची गंभीर चौकशी कऱण्याची गरज आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.