औरंगाबाद - कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून पुढील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होणार असल्याचा अंदाज असल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढणार आहे. तज्ज्ञांच्या मते ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 20 हजारांच्या वर जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यात 20 टक्के रुग्णांसाठी अत्यावश्यक रुग्णसेवा गरजेची असणार आहे. त्यामुळे तातडीने आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
कोरोनाग्रस्तांचा वाढता आलेख
जिल्ह्यातील रोज सुमारे दीड हजार नव्या कोविड रुग्णांची वाढत आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 81 हजार 137 झाली आहे. त्यात 64 हजार 218 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर 1 हजार 651 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण 15 हजार 268 रुग्ण उपचार घेत आहेत. मृतांची संख्याही वाढत असल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे.
जिल्ह्यातील बेड्सची संख्या
विना ऑक्सिजन बेड - 13 हजार 538
ऑक्सिजन बेड - 1 हजार 801
आयसीयू बेड - 708
व्हेंटिलेटर बेड - 472
यातील सुमारे 99 टक्के बेडवर रुग्ण आहेत. वाढते रुग्ण पाहता सध्याची आरोग्य यंत्रणा काही दिवसांत अपुरी पडेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा अधिक सज्ज करण्याची वेळ असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू मराठवाड्यात, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये उच्चांक