औरंगाबाद - छुप्या पद्धतीने व्हॉट्सअॅपवर मटका अड्डा चालवणाऱ्यासह चार जुगाऱ्यांना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा मारून अटक केले आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख सह सुमारे पाऊण लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
चार आरोपी ताब्यात....
दीपक हनुमंत घुसळे (रा.भीमनगर, दौलताबाद), शेख सिराज शेख गणी (रा.छोटी मंडी, दौलताबाद), असेफ खान जमशेद खान (रा.भीमनगर), सय्यद मझहर सय्यद एजाज (रा.छोटीमंडी,दौलताबाद) अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहे.
67 हजार 120 रुपयांचा ऐवज जप्त.....
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दौलताबाद येथील जुन्या बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात मटका जुगार चालू असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीवरून पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री 10च्या सुमारास तेथे छापा टाकला असता सर्वआरोपी तेथे व्हॉट्सअॅपवर पैसे लावून मटका नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी सर्व आरोपिना ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळ जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे चार मोबाईल व रोख रक्कम असा 67 हजार 120 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे
दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.....
याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उप निरीक्षक राहुल रोडे, पोलीस नाईक सय्यद शकील, इम्रान पठाण, विजय निकम, विठ्ठल आढे, विनोद पवार यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - सचिन-वीरूमुळे इंडिया लेजेंड्सचा बांगलादेशवर सहज विजय