ETV Bharat / state

औरंगाबादेत घोणस सापाने दिले २५ पिलांना जन्म - डॉ. किशोर पाठक

औरंगाबाद शहरातील जालना रस्त्यावर एका घरात घोणस या सापाने २५ पिलांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 15, 2019, 7:16 PM IST

औरंगाबाद - शहरातील जालना रस्त्यावर एका घरात घोणस या सापाने २५ पिलांना जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे. घोणस सापाप्रमाणे पिले देखील विषारी असून नैसर्गिक वातावरणात त्यांची वाढ व्हावी म्हणून सर्पमित्रांनी सापासह पिलांना सारोळ्याच्या जंगलात सोडल्याची माहिती मिळाली आहे.

औरंगाबादेत घोणस सापाने दिला २५ पिलांना जन्म

घोणस आणि मांडूळ या जातीचेच साप पिले देतात. घोणस हा एका वेळी २५ ते ३० पिले देऊ शकतो. घोणस हा २ नंबरचा सर्वात विषारी साप असून घोणस चावल्यास रक्तात गाठी तयार होतात. पहिल्या अर्ध्या तासात उपचार न मिळाल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

औरंगाबाद शहराच्या जवळील जालना रस्त्यावर असलेल्या एका वस्तीत शनिवारी घोणस जातीचा साप दिसून आला. साप दिसताच नागरिकांनी सर्पमित्रांना याबाबत माहिती दिली. डॉ. किशोर पाठक आणि नितेश जाधव या सर्पमित्रांनी जाऊन घोणसला सुरक्षितपणे पकडले. परिसराची तपासणी केली असता एका ठिकाणी या घोणसने २५ पिले दिल्याचे आढळून आले. पिलांना सर्पमित्रांनी पेडिग्री खाऊ घातले. त्यानंतर पिल्लांना जंगलात सोडले. साप कधीच आपल्या पिलांना अन्न भरवत नाही. पिल जन्माला आल की ते स्वतः आपले अन्न शोधून घेतात. यासाठी त्यांना तातडीने जंगलात सोडल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.

Intro:औरंगाबाद शहरातील जालना रस्त्यावर एका घरात घोणस या सापाने 25 पिल्लांना जन्म दिल्याची घटना घडली. घोणस सापाप्रमाणे पिल्ले देखील विषारी असून नैसर्गिक वातावरणात त्यांची वाढ व्हावी म्हणून सर्पमित्रांनी सापासह पिल्लांना सारोळ्याच्या जंगलात सोडण्यात आलं.
Body:घोणस आणि मांडूळ या जातीचेच साप पिल्ले देतात. घोणस हा एका वेळी 25 ते 30 पिल्ले देऊ शकतो. घोणस हा दोन नंबरचा सर्वात विषारी साप असून घोणस चावल्यास रक्तात गाठी तयार होतात. पहिल्या अर्ध्या तासात उपचार न मिळाल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो.Conclusion:औरंगाबाद शहराच्या जवळील जालना रस्त्यावर असलेल्या एका वस्तीत शनिवारी घोणस जातीचा साप दिसून आला. साप दिसताच नागरिकांनी सर्पमित्रांना याबाबत माहिती दिली. डॉ. किशोर पाठक आणि नितेश जाधव या सर्पमित्रांनी जाऊन घोणसला सुरक्षितपणे पकडले. परिसराची झाडाझडती घेतली असता एका ठिकाणी या घोणसने 25 पिल्ले दिल्याचं आढळून आलं. पिल्लांना सर्पमित्रांनी पेडिग्री खाऊ घातले. आणि पिल्लांना जंगलात सोडले. साप कधीच आपल्या पिल्लांना अन्न भरवत नाही, पिल्ल जन्माला आल की ते स्वतः आपलं अन्न शोधून घेतात. म्हणून त्यांना तातडीने जंगलात सोडल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.