ETV Bharat / state

कोरोनामुळे औरंगाबादमधील छोटे पंढरपूर मंदिर बंद; साध्या पद्धतीने पूजेची परंपरा कायम

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाळूज-पंढरपूर येथे साध्या पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यावेळी वाळूज एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना सपत्नीक पूजेचा मान देण्यात आला. मात्र, भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

Madhukar Sawant
पोलीस निरीक्षक मधुकर सावंत
author img

By

Published : Jul 1, 2020, 11:56 AM IST

औरंगाबाद- आषाढी एकादशीला आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक उत्सुक असतात. मात्र कोरोनामुळे देवस्थान बंद केल्याने भाविकांना आपल्या विठुरायाच्या दर्शनाला मुकावे लागले आहे. औरंगाबाद-नगर महामार्गावरील छोटे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाळूज- पंढरपूर येथील मंदिरात अगदी साध्या पद्धतीने आरती करुन आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला आहे. औरंगाबाद येथील प्रति पंढरपूर येथे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत हस्ते आरती करून परंपरा जपण्याचा प्रयत्न केला गेला.

औरंगाबाद-नगर महामार्गावरील छोट्या पंढरपुरात अगदी साध्या पद्धतीने मोजक्या मंदिर विश्वस्तांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत पूजा केली. वाळूज एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना सपत्नीक पूजेचा मान दिला. अगदी साध्या पद्धतीने आरती करत पूजेची परंपरा कायम ठेवली. पूजा जरी झाली असली तरी मंदिर मात्र भाविकांसाठी बंद राहणार असल्याचा फलक मंदिराबाहेर लावण्यात आला.

दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी वाळूज-पंढरपूर येथील मंदिर गजबजलेले असते. मंदिर परिसरात असलेली प्रचंड गर्दी, सजलेली अनेक दुकाने, विठुरायाच्या जयघोष करणाऱ्या घोषणा आणि भक्तिमय झालेलं वातावरण हे मनमोहक चित्र यावर्षी कोरोनामुळे पाहायला मिळाले नाही. वाळूज - पंढरपूर या परिसर गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना हॉटस्पॉट ठरला आहे. त्यात सरकारने देवस्थान बंद ठेवल्याने आजची आषाढी भाविकांनी घरीच पूजाअर्चा करून साजरी केली.

ज्या भाविकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही असे भाविक औरंगाबादच्या या वाळूज-पंढरपूरला दर्शनासाठी येतात. दीड ते दोन लाख भाविक दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. रात्री बाराच्या सुमारास आरती संपन्न होताच भाविक दर्शनासाठी रांगा लावायचे. आजही अनेक भाविक दुरुनच मंदिर कळसाचे दर्शन घेत आपल्या विठुराचे दर्शन घेत आहेत. पांडुरंगा यावर्षी कोरोनामुळे दर्शन जरी झाले नसले तरी लवकर कोरोनाचे संकट जाऊ दे... आणि पुढच्यावर्षी तुझे दर्शन घडू दे, अशी मनोकामना भाविकांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.