ETV Bharat / state

Arijit Singh Injured : लाईव्ह कार्यक्रमात चाहत्याने हात ओढल्याने अरिजित सिंह जखमी; चाहत्याला स्टेजवरच झापले, पाहा व्हिडिओ - अरिजित सिंह छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगर येथे रविवारी एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान चाहत्याने जोराने हात ओढल्याचा गायक अरिजित सिंह जखमी झाला. या घटनेनंतर अरिजितने अत्यंत संयमाने त्या चाहत्याची कानउघाडणी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Arijit Singh
अरिजित सिंह
author img

By

Published : May 8, 2023, 5:43 PM IST

छत्रपती संभाजीनगर : प्रसिद्ध गायक अरिजित सिंहचा चाहता वर्ग देशभरात आहे. नुकताच छत्रपती संभाजी नगर शहरात त्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चाहत्यांशी संवाद साधताना एका चाहत्याने त्याचा हात जोराने ओढल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे अरिजितच्या हाताला किरकोळ दुखापत झाली व काही काळ शो थांबवण्यात आला होता.

अरिजितच्या हाताला किरकोळ दुखापत : शहरातील कलासागर या सामाजिक संस्थेतर्फे प्रसिद्ध गायक अरिजित सिंहच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील एका मोकळ्या मैदानात रविवारी सायंकाळी शहरवासीयांनी या लाईव्ह शोचा आनंद लुटला. अरिजितचे खास वैशिष्ट्य म्हणजे तो गाणे गात असताना आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. गाणे गाताना तो हाताने सर्वांशी हस्तांदोलन देखील करतो. असाच प्रयत्न त्याने रविवारी झालेल्या शो मध्ये देखील केला. त्यावेळी एका चाहत्याने चक्क त्याचा हात जोराने ओढला. त्यामुळे तो खाली पडता पडता वाचला. मात्र त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर काही वेळ शो बंद करण्यात आला होता.

चाहत्याला स्टेजवर बोलावले : या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी त्या चाहत्याला पकडून बाजूला केले. मात्र अरिजित सिंहने त्याला स्टेजवर बोलावून त्याची कानउघाडणी केली. या कार्यक्रमाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही लोकांनी अरिजितचा हात ओढणाऱ्या व्यक्तीला फटकारले आहे. अरिजित सिंह सध्या त्याच्या देशव्यापी दौऱ्यात व्यस्त आहे. त्याने यापूर्वीच दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांमध्ये कार्यक्रम सादर केले आहेत. रविवारी तो छत्रपती संभाजीनगरमध्ये लाइव्ह परफॉर्म करत होता.

हेही वाचा :

  1. Shabana support The Kerala Story : शबाना आझमींचा द केरळ स्टोरीला पाठींबा, बहिष्काराची भाषा करणे घटनाबाह्य असल्याचे मांडले मत
  2. Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत मुंबई विमानतळावर स्पॉट; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव...
  3. Sonam Kapoor greets UK audience : सोनम कपूरने यूकेच्या प्रेक्षकांना 'नमस्ते' म्हणत कोरोनेशन कॉन्सर्टमध्ये केले अभिवादन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.