ETV Bharat / state

सिल्लोड येथील 'त्या' महिलेवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार - सिल्लोड जळीतकांड न्यूज

सिल्लोड तालुक्यातील जळीतकांड प्रकरणातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी या महिलेवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये, म्हणून अंधारी गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अंत्यसंस्कार
अंत्यसंस्कार
author img

By

Published : Feb 6, 2020, 11:29 PM IST

औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यात अंगावर रॉकेल टाकून महिलेला जाळण्याची घटना घडली होती. या घटनेतील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी या महिलेवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महिलेच्या मुलीसह संतप्त नातेवाईकांनी केली.

'त्या' महिलेवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास 50 वर्षीय पीडित महिला घरात झोपलेली असताना आरोपी संतोष सखाराम मोहिते याने घराची कडी वाजवली. महिलेने दरवाजा उघडताच तो आत घुसला. त्यावर महिलेने 'तू रात्री माझ्या घरी येत जाऊ नको, माझी बदनामी होते', असे म्हणत त्याला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यातून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर आरोपीने पीडितेला मारहाण करत अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'कठोर कायद्यासाठी गृह विभागाला सूचना करणार'

पीडित महिलेवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरुध्द विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिलेच्या मृत्यूनंतर आरोपी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी दिली.

गावाला छावणीचे स्वरुप -
अंत्यसंस्काराच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये, म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आला होता. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे, किरण आहेर, सिताराम म्हैत्रे यांच्यासह आरसीपीची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. यामुळे गावाला छावणीचे स्वरुप आले होते.

फाशीची शिक्षा देण्याची मागणी -
या प्रकरणातील आरोपीला फाशी शिक्षा देण्यात यावी, खटल्याच्या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, पीडितेच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत द्यावी, कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात यावे, पीडितेच्या मुलीला शासकीय नोकरी देण्यात यावी, समाजाला स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात यावा या मागण्या महिलेच्या नातेवाईकांनी केल्या.

Intro:औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलेल्या महिलेचा अखेर उपचार दरम्यान मृत्यू झाला. आज गुरुवारी (दि. 6) दुपारी 1 वाजेच्या सुमारास महिलेवर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी महिलेच्या मुलीसह संतप्त नातेवाइकांनी केली.

     या बाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि. 2) रात्री 11 वाजेच्या सुमारास 50 वर्षीय फिर्यादी पीडित महिला घरात झोपलेली असताना आरोपी संतोष सखाराम मोहिते याने घराची कडी वाजवली. दरवाजा उघडताच तो आत घुसला. त्यावर महिलेने तू असा रात्री माझ्या घरी येत जाऊ नको, माझी बदनामी होते असे म्हणत त्याला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यातून दोघांमध्ये भांडण झाले. आरोपीने मारहाण करीत प्लास्टिक डब्यातील रॉकेल टाकून पेटवून दिले, असा जबाब पीडितेने दिलेला आहे. 

    पीडित महिलेवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. तीन दिवस महिलेने मृत्युशी झुंज दिली. दरम्यान बुधवारी (दि. 5) महिलेची झुंज अपयशी ठरली व उपचार दरम्यान रात्री 10 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास महिलेवर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.Body:
   या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी विरुध्द विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान महिलेच्या मृत्यूनंतर आरोपी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी दिली.

*गावाला छावणीचे स्वरुप*  

   अंत्यसंस्काराच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात तगडा पोलिस बंदोबस्तात लावण्यात आला होता. अप्पर पोलिस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे, किरण आहेर (अजिंठा), सिताराम म्हैत्रे (सोयगाव) यांच्यासह पोलिस कर्मचारी व आरसीपीची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. यामुळे गावाला छावणीचे स्वरुप आले होते. दरम्यान गावात शांतता असल्याची माहिती किरण बिडवे यांनी दिली.  Conclusion:फाशीची शिक्षा देण्याची मागणी*

      दरम्यान आरोपीला फाशी शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीसह या प्रकरणात उजव्ल निकम याची नियुक्ती करावी, पीडितेच्या कुटूंबीयास 25 लाखाची मदत द्यावी, कुंटूबीयाचे पुनर्वसन करण्यात यावे, पीडितेच्या मुलीस शासकीय नौकरी देण्यात यावी व मांतग समाजास स्वसंरक्षणासाठी शस्ञ परवाना देण्यात यावा अशा मागण्या यावेळी महिलेच्या मुलीसह संतप्त नातेवाइकांनी केल्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.