ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेला अल्प प्रतिसाद; फक्त सतरा जणांनी घेतला लाभ

author img

By

Published : Aug 13, 2019, 7:29 AM IST

'माझी कन्या भाग्यश्री' योजनेला औरंगाबाद जिल्ह्यातून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. मागील दीड वर्षात जिल्हाभरातून यासाठी फक्त 35 प्रस्ताव दाखल झाले होते. मात्र, या योजनेचा लाभ पात्र ठरलेल्या सतरा पालकांना देण्यात आल्याची माहिती, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागातून मिळाली आहे.

औरंगाबादमध्ये 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेला अल्प प्रतिसाद

औरंगाबाद - 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेला जिल्ह्यातून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. मागील दीड वर्षात जिल्हाभरातून यासाठी फक्त 35 प्रस्ताव दाखल झाले होते. मात्र, या योजनेचा लाभ पात्र ठरलेल्या सतरा पालकांना देण्यात आल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातून मिळाली आहे.

औरंगाबादमध्ये 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेला अल्प प्रतिसाद; फक्त सतरा जणांनी घेतला लाभ

मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'बेटी बचाव बेटी पढाव' योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने 'माझी कन्या भाग्यश्री' योजना फेब्रुवारी 2016 पासून राबवण्यास सुरुवात केली आहे. मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक विचार आणणे आणि मुलींचा जन्मदर वाढविणे असा या योजनेमागील उद्देश आहे. एक किंवा दोन मुली असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो.

त्यासाठी मुलींच्या आईने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे. एक मुलगी असल्यास पन्नास हजार दोन मुली असल्यास प्रत्येकी 25 हजार रुपये आणि आई व मुलीच्या नावे असलेल्या संयुक्त बँक खात्यात जमा केली जातात. मुलीने 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर तिला सुमारे लाख सव्वा लाख रुपये मिळतात. 1 ऑगस्ट 2017 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना आहे.

2018 आणि 2019 तसेच 2019 ते 2020 या वर्षात जिल्हा परिषदेकडे या योजनेअंतर्गत 35 प्रस्ताव दाखल झाले आहेत. यापैकी पात्र ठरलेल्या केवळ सतरा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या सतरा लाभार्थ्यांपैकी औरंगाबाद तालुक्यातील श्रीनिधी नितीन कर तिच्या पालकांना जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते नुकताच 50 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना प्रस्तावावरील त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे.

Intro:माझी कन्या भाग्यश्री या योजनेला जिल्ह्यातून अल्प प्रतिसाद मिळाला असून दीड वर्षात या योजनेचे फक्त सतरा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहेत अशी माहिती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागातून मिळाली आहे.

Body: मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या 'माझी कन्या भाग्यश्री' या योजनेचा औरंगाबाद जिल्ह्यात केवळ 17 पालकांना लाभ मिळाला आहे, जिल्हाभरातून यासाठी 35 प्रस्ताव दाखल झाले होते, मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'बेटी बचाव बेटी पढाव' योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना फेब्रुवारी 2016 पासून राबवण्यास सुरुवात केली आहे मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक विचार आणणे मुलींचा जन्मदर वाढविणे असा या योजनेमागील उद्देश आहे एक किंवा दोन मुली असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो त्यासाठी मुलींच्या आईने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे, एक मुलगी असल्यास पन्नास हजार दोन मुली असल्यास प्रत्येकी 25 हजार रुपये आणि आई व मुलीच्या नावे असलेल्या संयुक्त बँक खात्यात जमा केली जातात, मुलीने 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर तिला सुमारे लाख सव्वा लाख रुपये मिळतात 1 ऑगस्ट 2017 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना आहे, 2018 आणि 2019 तसेच 2019 ते 2020 या वर्षात जिल्हा परिषदेकडे या योजनेअंतर्गत 35 प्रस्ताव दाखल झाले आहेत यापैकी पात्र ठरलेल्या केवळ सतरा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे, या सत्र लाभार्थ्यां पैकी औरंगाबाद तालुक्यातील श्रीनिधी नितीन कर तिच्या पालकांना जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते नुकताच 50 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला तसेच अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना प्रस्तावावरील त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.