अमरावती - महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची आणि विदर्भाती सर्वात मोठी शिक्षण संस्था असणाऱ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत Shivaji Education Institute Election पुन्हा एकदा हर्षवर्धन देशमुख Harshvardhan Deshmukh यांच्या प्रगती पॅनलचा झेंडा Victory of Shivaji Education Institute Progress Panel फडकला आहे. सलग दुऱ्यांदा हर्षवर्धन देशमुख हे संस्थेचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.
673 मतदारांनी केले मतदान - श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष, तीन उपाध्यक्ष आणि चार सदस्य पदाकरिता रविवारी निवडणूक झाली. श्री शिवाजी शाररिक शिक्षण महाविद्यालयात Shivaji College of Physical Education एकूण 774 पैकी 672 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजवला.
अशी झाली मतमोजणी - श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात सायंकाळी 7 वाजता मत मोजणी प्रक्रिया सुरू झाली. सर्वात आधी सदस्यांच्या 4 जागांची नंतर 3 उपाध्यक्ष, त्यानंतर कोषाध्यक्ष आणि शेवटी अध्यक्ष पदासाठी झालेल्या मतांची मोजणी करण्यात आली.
हर्षवर्धन देशमुख 127 मतांनी विजयी - अतिशय रंगतदार झालेल्या या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी प्रगती पॅनलचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख हे 127 मतांनी विजयी झालेत. त्यांच्या विरोधात असणारे नरेशचंद्र ठाकरे यांना 270 मतं मिळाली तर हर्षवर्धन देशमुख यांना 397 मतदारांनी पसंती दर्शवली. रात्री हा निकाल आल्यावर देशमुख समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
असा आहे निकाल - उपाध्यक्ष पदावर प्रगती पॅनलचे गजानन फुंडकर हे 392 मतं मिळवून निवडणून आले तर जयंत पाटील 318 मतं आणि विलास पॅनलचे केशव मेंतकर हे 295 मतं घेऊन विजयी झाले. कोषाध्यक्ष पदावर प्रगती पॅनलचे दिलीपबाबू इंगोले हे 424 मतं मिळवून विजयी झालेत. त्यांच्या विराधात असणारे विकास पॅनलचे बाळासाहेब वैद्य यांना 242 मतं मिळालेत. सदस्य पदावर हेमंत काळमेघ, केशव गावंडे, सुरेश खोटरे आणि सुभाष बनसोड हे सर्व प्रगती पॅनलचे उमेदवार विजयी झालेत. Shivaji Education Institute Election Harshvardhan Deshmukh again as President Pragati Panel Won Shivaji Education Institute Election