औरंगाबाद- कन्नड शहरातील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तहसील कार्यालयाला स्वयंचलित सॅनिटायझर टनेल मशीन मोफत भेट देण्यात आली आहे. याच्या माध्यमातून तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे निर्जंतुकीकरण होणार आहे.
हेही वाचा- ईटीव्ही भारत विशेष: लाॅकडाऊनमध्ये आदिवासी शिक्षितांपेक्षाही समजूतदार..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय हे प्रमुख प्रशासकीय केंद्र आहे. यामुळे येथे दररोज अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची ये-जा असते. येणाऱ्या प्रत्येकाचे निर्जंतुकीकरणासाठी तालुक्यातील रेल येथील अनिस गफूर बागवान यांनी मोठ्या कल्पकतेने बनवलेल्या सॅनिटायझर टनेल मशिनचा वापर करण्यात आला आहे, असे बाबासाहेब मोहिते यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, तहसीलदार संजय वारकड, शहर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर रेंगे, ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, संस्थेचे संचालक डॉ. ए.के.महाले, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा संस्थेचे संचालक बाबासाहेब मोहिते, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्ता देगावकर, डॉ.प्रवीण पवार, विलास पवार यांची उपस्थिती होती.