ETV Bharat / state

Accident on Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर अपघात मालिका सुरूच; कार अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी आणि मुलगी जखमी

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघात मालिका खंडित होण्यास तयार नाही. करमाडजवळ रस्त्यावरून कार खाली पडल्याने कुटुंबातील एकाचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी आणि मुलगा यात जखमी झाले आहेत. सुशीलकुमार थोरात असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिर्डीवरून देवदर्शन करून परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Accident on Samruddhi Highway
समृद्धी महामार्गावर अपघात
author img

By

Published : Jul 4, 2023, 12:52 PM IST

छत्रपती संभाजीनगर : वाशिम तालुक्यातील सुशीलकुमार दिलीप थोरात (वय 38), पत्नी बबीता (वय 36)आणि मुलगी अद्विती (वय 8) यांच्यासोबत शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साई दर्शन घेऊन ते परतत होते. तेव्हा समृद्धी महामार्गाच्या शेंद्रा एमआयडीसीतील जंक्शनचे काम सुरू असलेल्या भांबर्डे शिवारात कारवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी डाव्या बाजूला खाली तीस फूट जाऊन पडली. सुशील कुमार स्वतः गाडी चालवत होते, त्यात त्यांना जबर मार लागला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी बबीता ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आठ वर्षाची मुलगी अद्विती ही किरकोळ जखमी झाली आहे.

शेतकऱ्याने दिली माहिती : समृद्धी महामार्गावर जात असताना गाडीवरच नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात झाला. यावेळी जवळच गोठ्यात काम करत असलेल्या श्रीकांत पठारे या तरुणाने हा अपघात पाहताच, ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी जखमींना तातडीने मदत करत पोलिसांना याबाबत माहिती दिली. करमाड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठत जखमींना रुग्णवाहिनीद्वारे घाटी रुग्णालयात हलवले. तर सुशीलकुमार यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी वाशिमला पाठवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी करमाड पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

अपघात मालिका सुरूच : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्यास तयार नाही. दर दोन ते तीन दिवसांनी एक अपघात या महामार्गावर होत आहे. चार दिवसापूर्वीच बुलढाणा येथे झालेल्या भीषण अपघातात 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर रविवारी औरंगाबाद तालुक्यात महामार्गावर असाच एक अपघात झाला असून याच महामार्गावर आणखीन दोघांचा मृत्यू झाला होता. तर पुन्हा एक अपघात याच महामार्गावर तालुक्याच्या हद्दीत झाला आहे, असे अपघात दर आठवड्याला घडत आहेत. यावर काही उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

हेही वाचा :

  1. Beed Accident News: बीडच्या शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवरील दोन शिक्षकांचा अपघाती मृत्यू
  2. Buldhana Bus Accident: सर्वात मोठ्या अपघाताच्या मृतदेहांची चिता जळत असताना शपथविधीचा घाट का-विरोधकांची सरकारवर टीका
  3. KK Express Fire : के.के. एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये आग, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.