औरंगाबाद: काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकाने युवतीसोबत अश्लील वर्तन केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, स्कूल व्हॅनमध्ये रिक्षा चालकाने 3 लहान मुलींसोबत अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुली शाळेत जाण्यास तयार नव्हते. त्यातील एका मुलीने आईकडे झालेली आपबिती सांगितल्यावर, पालकांनी रिक्षा चालक आणि व्हॅन चालकाला सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विकास बनकर आणि राजू रुपेकर असे या आरोपींचे नावे आहेत.
शालेय वाहतूक झाली असुरक्षित: सिडको भागातील एका शाळेत 8 वर्षाच्या 2 आणि 9 वर्षाची एक या मुली एकाच परिसरातून एकाच शाळेत जातात. पालकांनी राजू रुपेकर या व्यक्तीकडे असलेल्या स्कूल व्हॅनमधून यांना शाळेत सोडण्यासाठीची सोय केली होती. त्याच शाळेत त्याचा 12 वर्षाचा मुलगाही शिकत होता. विद्यार्थ्यांची ने- आण करणाऱ्या रिक्षा चालक असलेल्या बनकर सोबत मैत्री होती. विद्यार्थ्यांना शाळेत सोडल्यावर व्हॅनमध्ये विकास नेहमी बसलेला असायचा.
मुलींसोबत काही घाणेरडे कृत्य: काही दिवसांपूर्वी तिन्ही मुली बसलेल्या असताना बनकर हा आरोपी व्हॅनमध्ये त्यांच्याजवळ जाऊन बसला. त्याने अश्लील चाळे सुरू केले होते. मुलींनी व्हॅन चालकाला, काका आपला व्हॅनमध्ये कोणीतरी घाणेरडा माणूस येऊन बसतोय, असे सांगितले होते. मात्र त्याने काहीही केले नाही. त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस विकासने मुलींसोबत काही घाणेरडे कृत्य करत होता. याबाबत घरी काही सांगितले तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी त्याने या 3 मुलींना दिली होती.
अशी समोर आली घटना: घाबरलेल्या मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिला. त्या घाबरलेल्या होत्या. त्यातील एका मुलीच्या आईने विचारपूस केल्यावर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यावरून पालकांनी परिसरातील वाहन तळाजवळ दबा धरून विकृत रिक्षा चालकास पकडले जमलेल्या नागरिकांनी रिक्षा आणि व्हॅन चालकास चोप देऊन सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात सिडको पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. त्यावरून सिडको पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.