ETV Bharat / state

जिल्हा परिषदेच्या शाळेत फडकवला उलटा राष्ट्रध्वज; मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कन्नड तालुक्यातील नागापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी चुकीने राष्ट्रध्वज उलटा फडकवण्यात आला. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात मुख्याधापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत फडकविला उलटा राष्ट्रध्वज
author img

By

Published : Aug 18, 2019, 10:34 AM IST

Updated : Aug 18, 2019, 12:20 PM IST

औरंगाबाद - स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मुख्याध्यापकाने उलटा राष्ट्रध्वज फडकवल्याचा प्रकार कन्नड तालुक्यातील नागापूर येथील शाळेत घडला. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात मुख्याधापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत फडकवला उलटा राष्ट्रध्वज

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कन्नड तालुक्यातील नागापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम गुरुवारी सकाळी सुरू झाला. त्यावेळी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. मात्र, चुकीने तो उलटा फडकवला गेला. त्यानंतर लगेच राष्ट्रगीताला सुरुवात झाली. मात्र, राष्ट्रगीत सुरू असताना उपस्थित ग्रामस्थांना ही बाब लक्षात आल्याने त्यांनी याबाबत मुख्यधापक दीपक बळे यांना सांगितले. त्यानंतर राष्ट्रगीत मध्येच थांबवून उलटा राष्ट्रध्वज खाली उतरवण्यात आला. पुन्हा व्यवस्थित करून राष्ट्रध्वज फडकविण्यात आले.

या घटनेचा काही उपस्थितांनी चित्रीकरण केले होते. ते व्हिडिओ व्हायरल झाले. यानंतर उपस्थित गावकरी सर्जेराव घुगे यांच्या तक्रारीवरून पिशोर पोलीस ठाण्यात राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंध अधिनियमानुसार शाळेचे मुख्याधापक दीपक बळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Intro:
स्वातंत्रदिनाच्या दिवशी ध्वजारोहनाच्या कार्यक्रमात मुख्यधपकाने उलटाराष्ट्रध्वज फडकविल्याचा प्रकार कन्नड तालुक्यातील नागापूर येथील शाळेत घडला याप्रकरनीं पिशोर पोलीस ठाण्यात मुख्यधापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Body:

स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने कन्नड तालुक्यातील नागापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम गुरुवारी सकाळी सुरू झालं त्यावेळी राष्ट्रध्वज फडकविण्यात आले मात्र चुकीने ते उलटे फडकविले गेले.त्यानंतवर लगेच राष्ट्रगीताला सुरुवात झाली. मात्र राष्ट्रगीत सुरू असताना उपस्थित ग्रामस्थांना ही बाब लक्षात आली त्यांनी मुख्यधापक दीपक बळे यांना सांगितले व राष्ट्रगीत मधेच थांबवुन उलट राष्ट्रध्वज खाली उतरविण्यात आले व पुन्हा व्यवस्थित करून राष्ट्रध्वज फडकविण्यात आले. या घटनेचा काही उपस्थितीने चित्रीकरण केले होते.ते व्हिडिओ व्हायरल झाले होते. या नंतर उपस्थित गावकरी सर्जेराव घुगे यांच्या तक्रारीवरून पिशोर पोलीस ठाण्यात राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंध अधिनियमानुसार शाळेचे मुख्यधापक दीपक बळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.Conclusion:
Last Updated : Aug 18, 2019, 12:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.