छत्रपती संभाजीनगर Ram Darbar On British Era : 22 जानेवारीला प्रभू श्रीराम मूर्तींची स्थापना अयोध्येतील मंदिरात होणार आहे. सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. त्यात इंग्रजांच्या काळातही त्यांच्या चलनावर प्रभू श्रीराम विराजमान होते अशी माहिती समोर आली आहे. शहरातील व्यावसायिक असलेले रमेश कोंदलकर यांच्या देवघरातील हे नाणे आता चर्चेत आले आहे. 1862 याकाळात ईस्ट इंडिया कंपनीने एक आण्याचं नाणं काढलं होतं. त्या नाण्याच्या एका बाजूला प्रभू श्री रामाचा दरबार होता. या नाण्याचं आजही पूजन कोंदलकर कुटुंबीय करत आहेत.
वीस ग्रॅम वजनाचे होते नाणे : व्यावसायिक असलेले रमेश कोंदलकर हे शहरातील अहिंसा नगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या देवघरातील इंग्रजांच्या काळातील एक नाणे राम मंदिराच्या कार्यक्रमाच्या काही दिवस आधी समोर आले आहे. ईस्ट इंडिया कंपनीने 1862 मध्ये हे नाणे चलनात आणले होते. या नाण्याचे वजन वीस ग्रॅम इतके आहे. नाण्याच्या एका बाजूला प्रभू श्री रामाचा दरबार आणि दुसऱ्या बाजूला ईस्ट इंडिया कंपनी असा एक आणा 1962 मध्ये होता. त्याकाळी तांबे आणि पितळ धातू पासून हे नाणं तयार करण्यात आलं होतं. आजही हे नाणं कोंदलकर कुटुंबीय मोठ्या भक्ती भावाने जतन करून त्याची पूजा करतात. पिढीजात आलेलं हे नाणं आमच्यासाठी अनमोल ठेवा असल्याचं रमेश कोंदलकर यांनी सांगितलं.
हनुमानाची मूर्ती देखील आहे खास : कुंदलकर यांच्या मंदिरातील प्रभू श्रीरामाचा दरबार असलेलं नाणं जितकं महत्त्वाचं, तितकंच तिथे असलेली हनुमानाची पंचधातूची मूर्ती देखील वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. पंचधातूची असलेली चार इंच इतकी उंच मूर्ती देखील पुरातन आहे. डावा हात कमरेवर आणि उजव्या हाताने आशीर्वाद देणारी ही मूर्ती आहे. गेल्या पाच ते सात पिढ्यांपासून ही मूर्ती देवघरात असल्याचं रमेश कोंदलकर यांनी सांगितलंय.
हेही वाचा -
नागपुरातील श्रीरामाचा असाही एक भक्त; १००१ लोकांच्या हातावर गोंदवतोय 'श्री रामा'चं नाव अन् तेही फ्री
जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा आणि धनुष यांनाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रण
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम 16 जानेवारीपासूनच होणार सुरू, कसा होणार अभिषेक?