ETV Bharat / state

'मराठवाडा वॉटर ग्रीड होणार, पण...' - माजी मंत्री अर्जुन खोतकर

पाणी परिषदेत घेण्यात येणाऱ्या ठरावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असून पाणी परिषदेतून अनेक नवनवीन संकल्पना समोर येतात. त्यामुळे परिषदा झाल्या पाहिजे, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

Rajesh Tope
राजेश टोपे
author img

By

Published : Feb 20, 2020, 11:44 PM IST

औरंगाबाद - मराठवाडा वॉटर ग्रीड होणार, पण त्यापूर्वी मराठवाड्यातील धरणामध्ये पश्चिम वाहिन्या नद्या जोडण्याचा विचार आहे. वॉटर ग्रीड व नद्या जोडो प्रकल्प एकसोबत करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. वॉटर ग्रीड करत असताना धरणातून पाणी आणणे, हे गरजेचं असले तरी अनेक धरणांत पाणीच नसल्याने बाहेरून पाणी आणण्यासाठी काही उपाय करता येतील का? हे पाहावे लागणार आहे, अस मत राज्याचे मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.

राजेश टोपे, मंत्री

औरंगाबादेत शिवसेनेतर्फे पाणी परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उदघाटन मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह जलतज्ञांनी हजेरी लावली.

यावेळी पाणी परिषदेत घेण्यात येणाऱ्या ठरावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असून पाणी परिषदेतून अनेक नवनवीन संकल्पना समोर येतात. त्यामुळे परिषदा झाल्या पाहिजे, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

निसर्ग नेहमी साथ देईल असं नाही -

मराठवाड्यातील धरणं प्रत्येक वर्षी भरतील, असे नाही. म्हणून पाणी साठवणे आणि इतर धरणातील वाहून जाणारे पाणी आणणे, हा एकच उपाय असल्याच मत राज्याचे मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. कृष्णा खोऱ्याच पाणी मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांसाठी आणता येईल. काही प्रश्न जलदगतीने सोडवणं गरजेचे आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर आहे, असे टोपे म्हणाले.

पाणी टंचाईमुळे अनेक गाव ओस पडण्याची भीती आहे. मराठवाड्यातील शेती आणि उद्योग नेहमीच अडचणीत सापडते. त्यामुळे समान पाणी वाटप करण्यात यावे. त्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी नियोजन केले पाहिजे. यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सिंचन हा महत्वाचा विषय असून अनेक गावांची परिस्थिती गंभीर असून पाऊस झाला नाही तर त्या गावात राहणं अवघड झालं असते, त्यामुळे या विषयाचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असे मत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.