औरंगाबाद - राज्यात सत्तेत असलेले शिंदे गट आणि भाजप ( Shinde Faction Bjp Dispute ) यांच्यात आगामी काळात दुरावा निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रहार संघटना ( Prahar Organization Will Elect Against Bjp ) पाच ठिकाणी आपले उमेदवार देणार अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली होती. त्यातच मराठवाडा शिक्षक मतदार संघात ( Teachers Constituency Election )मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. 11 तारखेला निवडणूक अर्ज भरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या निवडणुकीमुळे आगामी काळात युतीत फूट पडेल का? असा प्रश्न उपस्थिती होत आहे.
बच्चू कडू यांनी केली घोषणा राज्यात शिंदे फडणवीस सरकार ( Shinde And Fadnavis Government ) चांगले काम करत आहे. मात्र दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत ( Legislative Council elections 2023 ) मित्र पक्षांना विचारात घेतले नाही, असा आरोप प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी केला होता. त्यामुळे पाच ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीत प्रहार मेस्टा संघटनेच्या सोबत युती करून निवडणूक लढवेल अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली होती. 12 तारखेपूर्वी निवडणुकीबाबत अर्ज सादर करायचे असल्याने मेस्टा संघटनेने तयारी सुरू केली. 11 तारखेला मराठवाड्यातून अर्ज भरणार असल्याची घोषणा मेस्टा संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी केली.
पारंपरिक मक्तेदारी बंद करू शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. विद्यमान आमदार न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे पारंपरिक मक्तेदारी असलेले उमेदवार नाकारण्याची भूमिका शिक्षकांनी घेतली. त्यामुळेच आम्ही निवडणूक लढवत आहोत अशी भूमिका मेस्टा संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी जाहीर केली. गेली पंधरा वर्षे 63 हजार शिक्षक न्याय मागत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कर्ज काढून डीएड बीएड पूर्ण केले. कमी पगारात नोकरी करण्याची वेळ त्यांच्यावर आली. मुले मोठी झाली, मुलींची तर लग्नाची वेळ आली आहे. तरी या शिक्षकांना न्याय मिळत नाही. ज्या बापाने कर्ज काढून शिक्षण पूर्ण करून दिले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी देखील शिक्षकांकडे पैसे नाहीत. त्यामुळेच त्यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार आणि मेस्टा एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याचेही संजय तायडे पाटील यावेळी म्हणाले.