ETV Bharat / state

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांवर छापा, सट्टेबाजांशी संपर्क साधण्यासाठी ४ शिक्षिकांचा होत होता वापर

आयपीएल सुरू झाल्यापासून औरंगाबादेत पोलिसांनी केलेली ही तिसरी कारवाई आहे. या आधी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली होती. तरी देखील मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी सुरू होती.

Police seized Rs 5 lakh 57 thousand
पाच लाख ५७ हजारांचा ऐवज जप्त
author img

By

Published : Oct 24, 2020, 7:07 AM IST

औरंगाबाद- आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावण्यासाठी कॉलसेंटर उघडलेल्या दहा जणांसह आठ महिलांना अटक केली. रोजेबागेत सुरू असलेल्या या सेंटरवर छापा मारुन पोलिसांनी पाच लाख ५७ हजारांचा ऐवज जप्त केला. विशेष म्हणजे बेटींग लावणाऱ्या सट्टेबाजांशी संपर्क साधण्यासाठी तीन ते चार महिला शिक्षिकांचा देखील यात वापर करण्यात आला होता. पोलिसांनी या कॉलसेंटरमधून तब्बल ५२ मोबाईल, लॅपटॉप, सेट टॉप बॉक्स, रिमोट व रोख १२ हजार रुपये जप्त केले.

आयपीएल सुरू झाल्यापासून औरंगाबादेत पोलिसांनी केलेली ही तिसरी कारवाई आहे. या आधी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली होती. तरी देखील मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी सुरू होती.

रोजेबाग टाटा स्टेडीअम शेजारच्या एका इमारतीत महिला व पुरुष सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईल व्हॉटसअ‍ॅपद्वारे सट्टा खेळवित असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांना मिळाली होती. त्यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद मोहसीन अली यांनी पावणेआठच्या सुमारास फुलबन, प्लॉट क्र. २-ई, सिडको, एन-१२ येथे छापा मारला.

त्यावेळी पोलिसांनी शेख नवीद शेख मुजाहीद, शेख इमरान उर्फ रोनी पिता शेख चाँद, मोईन खान मुजीब खान, इम्रान खान, इरफान खान, शेख फरहान शेख मिया, मोहंमद रेहान शेख अश्पाक, सय्यद समीर सय्यद नसीर, सौरभ आत्माराम खाडे, शेख शाकीब शेख शरिफ, कासीफ खान नासेर खान यांच्यासह आठ महिलांना ताब्यात घेतले. तर चौघे घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.