ETV Bharat / state

शहरात दुकानाचे शटर उचकटून चोरी, दोन जण रंगे हात पोलिसांच्या ताब्यात - Burglary in Aurangabad

क्रांतीचौकात मध्यरात्री पाच दुकाने फोडून चोरांनी साडेपाच हजाराची रोकड, मोबाईल आणि हार्डडिस्क चोरली. तर, मोंढ्यातील दुकान फोडण्याचा प्रयत्न करतानाच पोलिसांनी दोन अट्टल गुन्हेगारांना पकडले.

शहरात दुकानाचे शटर उचकटून चोरी
शहरात दुकानाचे शटर उचकटून चोरी
author img

By

Published : Aug 12, 2020, 4:16 PM IST

औरंगाबाद - कोरोनाचे पडसाद आता घरफोडी, दुकानाचे शटर उचकटून चोरी यासारख्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. पोलिसांची रात्रगस्त ठाण्यापुरतीच अवलंबीत असल्याचे चित्र सध्या शहर व औद्योगिक वसाहतीत पाहायला मिळत आहे. शहरासह औद्योगिक वसाहतींमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. विशेष म्हणजे क्रांतीचौक, वेदांतनगर व जिन्सी पोलिसांनी घरफोड्यांना अवघ्या काही तासांत पकडल्याची देखील कौतुकास्पद बाब आहे. मात्र, काही अधिकारी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यातच रमलेले दिसतात.

दरम्यान, क्रांतीचौकात मध्यरात्री पाच दुकाने फोडून चोरांनी साडेपाच हजाराची रोकड, मोबाईल आणि हार्डडिस्क चोरली. तर, मोंढ्यातील दुकान फोडण्याचा प्रयत्न करतानाच पोलिसांनी दोन अट्टल गुन्हेगारांना पकडले.

क्रांतीचौकातील जयहिंद सुपर पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या वेलवर्थ क्रिएटिव्ह मिडीया, इराणी कॅफे आणि शिवराज ब्रॉड बॅण्ड इंटरनेट प्रायव्हेट लिमीटेड, कॅडअ‍ॅब्ज सॉफ्टवेअर सोल्युशन अशा पाच कार्यालयांचे शटर उचकटून चोरांनी साडेपाच हजारांची रोकड, मोबाईल आणि हार्डडिस्क लांबवली. हा प्रकार मध्यरात्री एक ते पहाटे साडेचारच्या सुमारास घडला. कार्यालय व दुकानांबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरीचा प्रकार दिसून आला आहे. त्यात तीन चोर असल्याचेही कॅमेऱ्यात दिसून आले.

सुरुवातीला रात्री एकच्या सुमारास चोरांनी माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचे शिवराज ब्रॉड बॅण्ड कंपनीचे दोन शटर उचकटवले. तेथून चोरांनी साडेपाच हजारांची रोकड हस्तगत केली. त्यानंतर कॅड अ‍ॅब्ज सॉफ्टवेअरचे शटर उचकटवले. मात्र, आतमध्ये कोणतीही रोकड आढळून आली नाही. त्यामुळे चोरांनी इराणी कॅफेच्या दिशेने मोर्चा वळवला. पण कॅफे ब-याच दिवसांपासून बंद असल्याने तेथून पुढे ते वेलवर्थ मिडीयाकडे गेले. वेलवर्थ कार्यालयाच्या ठिकाणी असलेल्या स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने काचेचा दरवाजा फोडला. त्यानंतर कार्यालयातील मोबाईल आणि पोर्टेबल हार्डडिस्क लांबवली. त्यानंतर चोरटे पसार झाले. याप्रकरणी शिवराज ब्रॉड बॅण्डचे मॅनेजर विजय खंडागळे व वेलवर्थचे अमीन राजन हौजवाला यांनी क्रांतीचौक पोलिसात तक्रार दिली आहे.

मोंढ्यात अट्टल गुन्हेगार जाळ्यात

दिवाण देवडीतील रहिवासी विरेंद्र टेटवार यांचे मोंढ्यातील विरेंद्र ट्रेडिंग हे तेलाचे दुकान रात्री दोन वाजून ४४ मिनिटांनी फोडायला सुरूवात केली. या दुकानाला दोन शटर असून, पहिले शटर सेंटर लॉकमुळे चोरांना उघडता आले नाही. त्यानंतर चोरांनी दोन वाजून ५२ मिनिटांनी दुस-या शटरकडे मोर्चा वळवला. हे शटर फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गस्तीवर असलेले सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत पुणे, जमादार बबन राठोड आणि चिमाजी मधे यांनी तीन वाजून १३ मिनिटांनी दोन्ही अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनी शेख उमेर शेख आरेफ (२७, रा. कटकटगेट, शरीफ कॉलनी, नेहरुनगर) आणि सय्यद अलीम सय्यद मुज्जू (२७, रा. कटकट गेट, शरीफ कॉलनी, गल्ली क्र. ३) असे नाव असल्याचे सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.