ETV Bharat / state

औरंगाबाद पोलिसांनी 22 दुचाकी चोरणाऱ्याला केली अटक

author img

By

Published : May 29, 2021, 8:40 AM IST

शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोऱ्या वाढल्या आहेत. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी वाहन चोरीच्या वेळा आणि ठिकाणांचा अभ्यास केला. त्यानंतर तब्बल २३ दिवस पाळत ठेवत एका चोरट्याला त्यांनी रंगेहाथ पकडले. त्याने २२ दुचाकी चोरल्याचे सांगून त्या गाड्या विक्री करण्यासाठी त्याच्या साथीसाराकडे दिल्याचे कबूल केले.

police arrested a accused for stealing 22 bikes in aurangabad
दुचाकी

औरंगाबाद - दुचाकी चोरीचे प्रकार वाढल्याचे लक्षात आल्यावर सिटीचौक पोलिसांनी तब्बल २३ दिवस पाळत ठेवत एका चोरट्याला त्यांनी रंगेहाथ पकडले. त्याने २२ दुचाकी चोरल्याचे सांगून त्या गाड्या विक्री करण्यासाठी त्याच्या साथीसाराकडे दिल्याचे कबूल केले. पोलिसांनी सिल्लोड तालुक्यात जाऊन त्याच्या साथीदाराला पकडले आणि त्याच्याकडून २२ दुचाकी हस्तगत केल्या.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोऱ्या वाढल्या आहेत. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी वाहन चोरीच्या वेळा आणि ठिकाणांचा अभ्यास केला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सिटीचौक पोलिसांनी शहागंज भाजीमंडी, कॅन्सर हॉस्पिटल आणि जामा मशीद परिसरात साध्या वेशातील ६ पोलीस तैनात केले. संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता गौसखा काले खाँ पठाण (ह. मु. ब्रीजवाडी, मूळ रा. नाणेगाव, ता. सिल्लोड) असे नाव त्याने सांगितले. मी दुचाकी चोरून साथीदार नवाब खाँ उस्मानखाँ पठाण (30, रा. गोद्री, ता. भोकरदन) याला नेऊन देतो. नवाबखाँ चोरलेल्या दुचाकी विक्री करतो, अशी कबुली दिली.

फायनान्स कंपनीची दुचाकी असल्याची थाप मारून विक्री..

आरोपी नवाबखाँ गावातील शेतकरी, मजूर यांना फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या दुचाकी असल्याची थाप मारून २० ते २५ हजारांत दुचाकी विक्री करायचा. ७५ ते ८० टक्के रक्कम आधी घेऊन उर्वरित रक्कम गाडीची कागदपत्रे देताना द्या असे सांगायचा. अशा सिल्लोड आणि भोकरदन तालुक्यात विक्री केलेल्या २२ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला होता कैद..

पोलिसांना आरोपीची चेहरेपट्टी माहिती होती. शहागंज भाजीमंडीत सकाळी एक जण मोबाईलवर बोलत दुचाकीला चावी लावत होता. त्याने दोन दुचाकींना चाव्या लावल्या, परंतु त्यांचे कुलूप उघडले नाही. त्यामुळे तो तिसऱ्या दचाकीला चावी लावन फिरवत असतानाच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. ठाण्यात नेऊन कसून चौकशी सुरू करताच त्याने त्याचे कबुली दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.