औरंगाबाद - मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आकाश प्रकाश ठोकळ (वय 19, रा. चिकलठाणा) याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - डेंग्यू सदृश्य आजाराने चिमुकल्याचा मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी, की सिडको, एन-4 भागातील १७ वर्षीय मुलगी 14 नोव्हेंबरला सकाळी अकराच्या सुमारास किराणा दुकानात दुधाची पिशवी आणण्यासाठी गेली होती. यावेळी ती अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी तिचा मॉल व मैत्रिणींकडे शोध घेतला. त्यानंतर 15 नोव्हेंबरला दुपारी 12 च्या सुमारास ही मुलगी घरी परतली. यावेळी आईने तिच्याकडे विचारपूस केली.
हेही वाचा - सावकारी कर्ज आणि नापिकीला कंटाळून 28 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
तेव्हा तिने मित्र आकाश ठोकळ याने तिला मित्र सनी याचा वाढदिवस आहे. सगळे मित्र त्याचा वाढदिवस देवळाई चौकात घेतलेल्या एका किरायाच्या फ्लॅटमध्ये साजरा करणार आहोत. त्यामुळे तू सुध्दा माझ्यासोबत चल, असे म्हणाला. मुलीने त्याच्या सोबत जाण्यासाठी नकार दिला. मात्र, त्याने बळजबरी तिला दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर रात्री सनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचवेळी आकाशने तिला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले. रात्री फ्लॅटमधील एका खोलीत आकाशने तिच्यावर अत्याचार केला.
हा प्रकार सकाळी लक्षात आल्यावर मुलीने घर गाठले. हा प्रकार समजल्यानंतर मुलीसह तिच्या आईने पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी आकाश ठोकळ याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुध्द पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.