ETV Bharat / state

30 एप्रिलपर्यंत कायम राहणार अंशतः लॉकडाऊन; रात्रीची संचारबंदीही कायम

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लादले असून जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

author img

By

Published : Apr 4, 2021, 1:12 PM IST

Aurangabad Lockdown
औरंगाबाद लॉकडाऊन

औरंगाबाद - जिल्ह्यातील अंशतः लॉकडाऊनमध्ये आता 30 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याकाळात संचारबंदी व जमाव बंदीचे आदेश लागू असतील. तर, दर शनिवारी आणि रविवारी कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

अंशतः लॉक डाऊनचा पहिला टप्पा पूर्ण -

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिल असा अंशतः लॉकडाऊन लावण्याची घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली होती. मात्र, याकाळात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने अंशतः लॉकडाऊनचा पहिला टप्पा पूर्ण होताच 30 एप्रिलपर्यंत हेच नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात सकाळी ७ ते रात्री ८ या काळात नियम अटींसह बाजारपेठा उघड्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हॉटेलमध्ये मिळणार फक्त पार्सल -

नवीन नियमावलीनुसार हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, नाष्टा सेंटर 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण बंद ठेवले जाणार आहेत. रात्री आठपर्यंत घरपोहच पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्यांवरील खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये अन्नपदार्थ सेवन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. फक्त पार्सल घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व ज्युस सेंटर आणि रसवंती गृह बंद करण्यात आले असून, तिथे देखील फक्त पार्सल सुविधा आज परवानगी देण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवा असणार सुरू -

जिल्ह्यात लावण्यात आलेल्या नियमानुसार अत्यावश्यक कारणांशिवाय रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी लावण्यात आली आहे. यामधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळण्यात आला आहे. दुध, भाजीपाला, फळे, वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या आस्थापनांना लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना आणि त्यांच्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. तसेच ज्या उद्योजकांचे शिफ्टमध्ये काम चालते, अशा आस्थापनांच्या वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहेत. भाजीपाला व फळ विक्रेते यांची जाधववाडी येथे एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी महापालिका क्षेत्रातील नऊ वेगवेगळ्या भागांमध्ये 41 ठिकाणी विक्रीसाठी जागा देण्यात आली आहे. सर्व आठवडी बाजार व कोचिंग क्लासेस तीस एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.