औरंगाबाद- पैठण शहरातील इंदिरानगर येथून देशी दारूचा साठा जप्त करण्यात पैठण पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई काल सकाळच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर येथील एका घरात दोन व्यक्ती देशी दारूची विक्री करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सदर भागातील घरात छापा टाकून दारूचे ७० हजार रुपये किमतीचे ८ बॉक्सेस जप्त केले आहेत. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई पोलीस उपअधीक्षक गोरख भांबरे, पैठण पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, बीट जमादार गोपाल पाटील व सहकाऱ्यांनी पार पाडली. पुढील तपास गोपाल पाटील करीत आहेत.
हेही वाचा- औरंगाबाद शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा राडा, ३ जखमी