ETV Bharat / state

क्रुझरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; गुन्हा दाखल - औरंगाबाद दुचाकीस्वार ठार

भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रुझरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना काल शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आडगाव शिवारात घडली. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

file photo
file photo
author img

By

Published : Dec 19, 2021, 1:29 AM IST

औरंगाबाद - भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रुझरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना काल शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आडगाव शिवारात घडली. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

सुरेश अर्जून जाधव (वय 35 रा.कचनेर) हे दुचाकीने औरंगाबादच्या दिशेने येत होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाठीमागुन भरधाव वेगाने येणाऱ्या क्रुझरने (एमएच १५ डीएस ८१६४) धडक दिली. यात सुरेश जाधव हे गंभीर जखमी झाले. निपाणी येथील सचिन डोईफोडे, नवनाथ भालेकर, विकास घोडके, ज्ञानेशवर गव्हारे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली.

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल -

यावरून चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास गात, विशाल लोंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे सचिन ढवळे आणि जाधव यांनी देखील घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून जाधव यांना मृत घोषित केले. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात चारचाकीच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.