ETV Bharat / state

Ambedkar Jayanti : अवकाशातील तारा ओळखला जातोय बाबासाहेबांच्या नावाने, पहा कसा पाहायचा हा तारा... - राजू शिंदे

संभाजीनगर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजू शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एका ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे. बाबासाहेबांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने त्यांनी बाबासाहेबांना अनोखी अदरांजली वाहिली आहे. अमेरिकेतील इंटरनॅशनल स्पेस रजेस्ट्री जाऊन या ताऱ्याला तुम्हाला पाहता येणार आहे.

Ambedkar Jayanti
Ambedkar Jayanti
author img

By

Published : Apr 14, 2023, 10:50 PM IST

Updated : May 8, 2023, 2:08 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एका ताऱ्याची रजिस्ट्री

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र जल्लोषात साजरी केली जात आहे. मात्र हा दिवस विशेष झाला आहे, कारण आज पासून अवकाशातला तारा बाबासाहेबांच्या नावाने ओळखला जाणार आहे. बाबासाहेबांचे अनुयायी राजू शिंदे यांनी अमेरिकेतील संस्थेला संपर्क करत गेल्या काही महिन्यांनी प्रयत्न करून, अवकाशातील ताऱ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले. आता जोपर्यंत चंद्र, सूर्य राहतील तोपर्यंत, त्यांचे नाव राहील असे मत राजू शिंदे यांनी व्यक्त केले.

अस बघा अवकाशात बाबासाहेबांचे नाव : अवकाशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक तारा ओळखला जातोय. ही ओळख त्यांच्या जयंतीनिमित्त देण्यात आली. हा तारा सर्वसामान्य आपल्या नजरेला पडू शकतो, मात्र त्याला पाहण्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरलेली आहे. रोज ती वेळ बदलत असते, त्यामुळे ज्यांना हा तारा पाहायचा आहे त्यांना रात्री अवकाशात दुर्बीण द्वारे पाहणी करावी लागेल. आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर देखील या ताऱ्याला पाहता येईल. इंटरनॅशनल स्पेस रजिस्ट्री या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन नंबर CX26529US टाकल्यावर या ताऱ्या बाबत सखोल माहिती पाहायला मिळेल. इतकच नाही तर मोबाईलवर हा तारा आपल्याला दिसून येईल अशी माहिती राजू शिंदे यांनी दिली.

ताऱ्याला दिले बाबासाहेबांचे नाव : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला नवी दिशा दाखवली त्यांचे कार्य मोठ आहे. ज्यावेळी त्यांचे महापरिनिर्वाण झाले, त्यावेळी जब तक सुरज चाँद रहेगा बाबासाहेब आंबेडकर का नाम रहेगा अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. मात्र खरंच अस् करता येईल का याबाबत काही वर्षापासून अभ्यास करण्यात आला. बाबासाहेबांचे अनुयायी असलेले राजू शिंदे यांनी अमेरिकेतील इंटरनॅशनल स्पेस रजेस्ट्री या संस्था सोबत माहिती घेतली. त्यावेळी आपण एखाद्या ताऱ्याला नाव देऊ शकतो, अशी माहिती मिळाली. त्याच वेळी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. एखादा ताऱ्याला जर नाव द्यायचे असेल तर त्याची प्रक्रिया किचकट आणि मोठी असते. तीन ते चार वर्षांचा कालावधी साधारणतः लागतो. मात्र दिलेल्या कागदपत्रानुसार आणि इंटरनेटच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिळालेल्या माहितीमुळे त्यांचे कार्य खूप मोठ आहे हे स्पष्ट झाले. त्यामुळे अवघ्या काही महिन्यातच ताऱ्याला नाव देण्यात आले. आंबेडकर जयंतीच्या काही तास आधी ते प्रमाणपत्र प्राप्त झाले. बाबासाहेबांच्या अनुयायांना एक नवी पर्वणी आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने देण्यात आली.

सायंकाळ पासून अनेकांनी अनुभवला ऑनलाईन अनुभव : अवकाशातील तारे रात्रीच्या वेळी पाहताना वेगळाच आनंद मिळत असतो. अवकाशातील असंख्य तारे असतात. मात्र त्यातील काही निवडकच आपण पाहू शकतो. त्यातील एक तारा आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखला जातोय. ही माहिती सकाळपासून वाऱ्यासारखी पसरली आहे. अनेकांनी आपल्या मोबाईल, लॅपटॉपच्या माध्यमातून या ताऱ्यासंदर्भात माहिती घेतली आहे. ज्यांनी देशाला संविधान दिले, नवी दिशा दाखवली त्या लाडक्या बाबासाहेबांना आता अवकाशातही ओळख मिळाली त्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा - Vajramooth Sabha : नागपुरात वज्रमूठ सभा होणारच - संजय राऊत

Last Updated : May 8, 2023, 2:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.