औरंगाबाद - जिल्ह्यातील 99 रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 11 हजार 765 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 6 हजार 497 बरे झाले तर 408 जणांचा मृत्यू झाला. सध्या 4 हजार 860 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मंगळवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. दिवसभरात 425 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 36 तासात आठ जणांचे उपचार दरम्यान मृत्यू झाले आहेत. यामध्ये महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात काम करणाऱ्या तीन अभियंत्यांना कोरोनाची लागण झाल्याच निष्पन्न झाले आहे.
मंगळवारी व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर 107 व्यापारी हो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 398 व्यापारी कोरोनाबाधित असल्याच निष्पन्न झाले आहे.
विविध भागात आढळलेले रुग्ण -
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 56 नवे रुग्ण आढळून आले आहेत ज्यामध्ये जवाहर कॉलनी (4), साई नगर, सातारा परिसर (1), मोतीवाला नगर (1), एमजीएम हॉस्टेल परिसर (1), टाऊन सेंटर (1), एन सहा संभाजी कॉलनी (3), इंदिरा नगर, गारखेडा (1), एन सात (1), म्हाडा कॉलनी, पीर बाजार (1), बिस्मिल्ला कॉलनी (5), स्वामी विवेकानंद नगर (1), क्रांती नगर (2), बन्सीलाल नगर (2), न्यू नंदनवन कॉलनी (1), छावणी (1), पद्मपुरा (1), तथागत नगर (1), राम नगर (1), इंदिरा नगर, गारखेडा (4), आंबेडकर नगर (3), ब्रिजवाडी (2), शिवाजी नगर (6), कासलवाल तारांगण परिसर,पडेगाव (1), शिवाजी नगर,गारखेडा (1), जवाहर कॉलनी (1), नारेगाव (2), पन्नालाल नगर (1), रोशन गेट (1), अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका (1), हर्सुल (1), भक्तीनगर, पिसादेवी रोड (1), गारखेडा (1), चिकलठाणा (1) या भागातील रुग्ण आहेत.
ग्रामीण भागातील रुग्ण 36 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये औरंगाबाद (13), पैठण (05), हनुमान नगर, रांजणगाव (1), चिंचोली लिंबाजी, कन्नड (1), साकळी बु. (1), सूर्यवंशी नगर, बजाज नगर (1), श्रीराम नगर, बजाज नगर (2), वडगाव कोल्हाटी (1), खतखेडा, कन्नड (1), रांजणगाव, गंगापूर (1), महेबुबखेडा (3), पंचशील नगर, वैजापूर (5), जीवनगंगा,वैजापूर (1) या भागातील रुग्ण आहेत. त्याचबरोबर शहरात दाखल होणाऱ्या मुख्य रस्त्यांवर 7 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये रांजणगाव (5), सिडको महानगर (2) या मार्गांचा समावेश आहे.