ETV Bharat / state

बिहारच्या पराभवातून भाजपने काही तरी शिकावे, जयंत पाटील यांचा टोला - राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजप टीका

बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लवकरच सत्ता परिवर्तन होईल, असे भाजप म्हणत आहे. मात्र, तसे होणार नाही. देवेंद्र फडणवीस काहीही म्हणू द्या, आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करणार, उलट भाजपतच लवकरच गळती लागणार आहे. त्यानंतर फडणवीस असे बोलणार नाहीत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

औरंगाबाद
औरंगाबाद
author img

By

Published : Nov 12, 2020, 3:45 PM IST

औरंगाबाद - भाजप आणि नितीशकुमार यांचा बिहार निवडणुकीत पराभव झाला असल्याचे मी मानतो. लालू प्रसाद यादव यांच्या मुलाने कुठलीही साधने नसताना दिलेली झुंज कौतुकास्पद आहे. भाजपने हा विजय न समजता त्यातून बोध घेतला पाहिजे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.

बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सतीश चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे यांच्यासह शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अन्य नेते यावेळी सतीश चव्हाण यांच्यासोबत होते. सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

भाजपत लवकरच गळती

बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लवकरच सत्ता परिवर्तन होईल, असे भाजप म्हणत आहे. मात्र, तसे होणार नाही. देवेंद्र फडणवीस काहीही म्हणू द्या, आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करणार, उलट भाजपतच लवकरच गळती लागणार आहे. त्यानंतर फडणवीस असे बोलणार नाहीत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवारी मागे घेतील

महाविकास आघाडीतर्फे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने. काही बंडखोरांनी भरलेले अर्ज मागे घेतले जातील. तशी बोलणी सुरू आहे. त्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे वक्तव्य करत बच्चू कडू यांच्या प्रहारच्या वतीने दिली गेलेली उमेदवारी मागे घेतली जाईल, असे संकेत जयंत पाटील यांनी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.